17 October 2019

News Flash

पंतप्रधानांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नरेंद्र मोदी.

आज हिंदू नववर्षातील पहिला दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. राज्यात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू नववर्षाआरंभी महाराष्ट्रातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरुन गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील माझ्या मित्रपरिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हे वर्ष भरभराटीचे, आरोग्यदायी आणि आनंदी जावो असे पंतप्रधानांनी ट्विटवर म्हटले आहे. गुढीपाडव्यासोबतत पंतप्रधानांनी उगडीच्याही नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

First Published on April 8, 2016 7:52 am

Web Title: pm narendra modi wishes the people a happy new year