News Flash

करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

करोनासंबंधी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेली ही दुसरी बैठक आहे

देशातील करोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. करोनासंबंधी चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने बोलावलेली ही दुसरी बैठक आहे. भारतात ९४ लाखांहून अधिक लोकांना करोना महामारीचा फटका बसला आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

या बैठकीला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित असतील. संसदीय कार्यमंत्रालयाने बैठकीसंबंधी सभागृह नेत्यांशी संपर्क साधला आहे.

आणखी वाचा- Coronavirus : देशभरात २४ तासांत ३८ हजार ७७२ नवे करोनाबाधित, ४४३ रुग्णांचा मृत्यू

करोना रुग्णसंख्येच्या बातमीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सर्वात कमी मृत्यू झालेल्या देशांमध्ये भारताचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. ३० जानेवारीला करोनाची पहिली केस समोर आल्यानंतर आतापर्यंत ८८ लाख करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून १ लाख ३० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 3:48 pm

Web Title: pm to chair all party meet on friday to discuss covid 19 situation sgy 87
Next Stories
1 अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन कुत्र्यासोबत खेळताना पाय घसरुन पडले आणि….
2 तीन-चार महिन्यांत देशातील नागरिकांना करोनावरील लस मिळेल – डॉ. हर्षवर्धन
3 रिक्षाच्या चाकात महिलेच्या गळयातील ओढणी अडकली आणि…
Just Now!
X