News Flash

‘iPhone कारखान्यातील हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चिंतित’

अ‍ॅपल एक महत्त्वाची परदेशी कंपनी आहे.

“आयफोनचे उत्पादन करणाऱ्या विस्ट्रॉनच्या कारखान्यात झालेल्या हिंसाचारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप चिंतेमध्ये आहेत” असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा गुरुवारी म्हणाले. तैवान स्थिती विस्ट्रॉन कंपनी अ‍ॅपलसाठी मोबाइल उत्पादनाचे काम करते. या कंपनीच्या बंगळुरु जवळच्या कोलार येथील प्रकल्पात मागच्या आठवडयात हिंसाचार झाला.

शेकडो कामगारांनी कंपनीमध्ये तोडफोड केली. कंपनीतील आयफोन आणि लॅपटॉप लुटले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांचे ७० लाख डॉलरचे नुकसान झाले. “आम्ही कारवाई केली आहे. अ‍ॅपल एक महत्त्वाची परदेशी कंपनी आहे. हे असे घडायला नको होते. या घडामोडींमुळे पंतप्रधान मोदी स्वत: चिंतेमध्ये आहेत” असे येडियुरप्पा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आणखी वाचा- विस्ट्रॉन प्रकल्पाच्या हिंसाचारात हजारो iPhone लुटले, ४४० कोटीचे नुकसान

“अशा गोष्टींची पुनरावृत्ती होणर नाही. आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ. कुठल्याही अडचणीशिवाय त्यांना त्यांचे उत्पादन करता आले पाहिजे” असे येडियुरप्पा म्हणाले. कामाचे तास आणि थकीत वेतनाच्या मागणीवरुन शनिवारी विस्ट्रॉन प्रकल्पातील कामगारांनी तोडफोड केली. रॉड आणि काठयांनी लोक कंपनीतील साहित्याची तोडफोड करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. खिडकीच्या काचा फोडल्या. गाडया पेटवून दिल्या. अ‍ॅपल कंपनी स्वत: या प्रकाराची चौकशी करत आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आणि ऑडिटर्सना त्या ठिकाणी पाठवले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 4:10 pm

Web Title: pm very worried bs yediyurappa on violence at iphone factory dmp 82
Next Stories
1 सुवेंदू अधिकारी यांचा तृणमूलला अलविदा; ममतांकडे सोपवला राजीनामा
2 केंद्रानं वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याचा विचार करावा -सर्वोच्च न्यायालय
3 डॉ. काफिल खान प्रकरणात योगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून झटका
Just Now!
X