News Flash

मोदींचे २० लाख कोटींचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा, सोनिया गांधी यांची टीका

सोनिया गांधी यांची मोदी सरकारवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी. (संग्रहित छायाचित्र)

केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे केंद्र सरकारने सपशेल दुर्लक्ष केलं आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. पीटीआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. तसंच अशा प्रकारचं पॅकेज जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे असं या सरकारला वाटलं नाही. यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला असंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे.

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. तसंच या पॅकेजमध्ये शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरीबांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आलं. त्यातल्या तरतुदीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चार दिवस पत्रकार परिषदही घेतली. मात्र हे सगळं पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका आता सोनिया गांधी यांनी केली आहे.

“सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. तसेच अम्फान या चक्रीवादळाचाही फटका बसला आहे. अशा सगळ्या परिस्थितीत करोनामुळे जी स्थिती निर्माण झाली ती हाताळण्यात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे” असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सगळ्या विरोधी पक्षांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक पार पडली. त्या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

“करोनाचं संकट देशात नंतर आलं, त्याआधीच देशाच्या अर्थव्यवस्थेचा आलेख खालावला होता. नोटबंदी, जीएसटी यांसारखे निर्णय मोदी सरकारने घेतले. त्यामुळे २०१७ पासूनच देशाची आर्थिक घडी बिघडण्यास सुरुवात झाली. हे सरकार चुकीच्या पद्धतीने निर्णय घेत पुढे जात राहिले” असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 4:15 pm

Web Title: pms grand rs 20 lakh crore package has turned out to be cruel joke on country says sonia gandhi scj 81
Next Stories
1 पाकिस्तानात भीषण विमान अपघात, कराची एअरपोर्ट जवळ प्रवासी विमान कोसळलं
2 करोनाची लस लवकर मिळेलच याची शाश्वती नाही; अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञाने दिला इशारा
3 सहाव्या इयत्तेतील मुलावर तरुणीकडे सेक्स चॅटची मागणी केल्याचा आरोप
Just Now!
X