News Flash

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

पीएएनबी घोटाळा २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

| March 21, 2019 02:24 am

संग्रहित छायाचित्र

पीएएनबी घोटाळा २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

लंडन : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचे सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी यास स्कॉटलँड यार्डने लंडन येथील होलबार्न मेट्रो स्टेशनवरून अटक केली. त्याचा लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून त्याला ९ दिवसांची म्हणजे २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटकेनंतर ४ ८ वर्षीय नीरव  मोदीनेन न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.  तसेच कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. त्याचे वकील जॉर्ज हेबुर्न स्कॉट यांनी आपल्या अशीलाकडे  प्रवासाचे तीन वेगवेगळे परवाने आहेत, असे न्यायालयाला सांगितले. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर केला. वेस्टमिन्स्टर कोर्टात बराचवेळ चाललेल्या सुनावनी नंतर न्यायालयाने नीरव मोदी यास पोलीस कोठडी सुनावली. नरीव मोठय़ा रकमेचा घोटाळ्यात सहभागी आहे. त्याला सोडणे म्हणजे त्याला पळण्याची संधी देणे होय, असे सांगून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याची वर्ड्सवर्थच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढील सुनावणी २९ मार्चला आहे. याच न्यायालयाने नीरव मोदीविरुद्ध अटक वारंट काढला होता. भारतातून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी  प्रत्यर्पणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन पुढील आठवडय़ात लंडन जातील. भारतात प्रत्यार्पणाबातची सुनावणी न्यायालयात केली जाणार आहे.  नीरव मोदी याने १३, ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुंबईतील आर्थिक घोटाळा प्रतिबंधक कायदा न्यायालयाने ईडीला नीरवच्या ११ महागडय़ा कार आणि १७३ पेंटिंग्जचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे.

जामीन का नाकारला?

याआधी विजय मल्या याला लंडनमध्ये अटक झाल्यावर जामीन मिळाला होता. मात्र पीएनबी घोटाळ्यातील नीरव मोदीचा जामीन फेटाळण्यात आला. आता त्याला भारतात आणणे शक्य आहे काय, असा प्रश्न केला जात आहे. विजय माल्याला लंडनमध्ये अटक  झाल्यावरही त्याला अद्याप भारतात आणणे शक्य झाले नाही. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी आहेत. माल्यावर ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे. अटकेपूर्वी माल्या लंडनला पळून गेला होता. भारतातील न्यायालयाने त्याला कर्जबुडब्या जाहीर करून फरार घोषित केले होते. परंतु लंडनच्या न्यायालयात त्यांच्या विरोधात प्रकरण भक्कम नव्हते. त्यामुळे त्याला प्रत्येक वेळी जामीन मिळाला. त्याचे प्रत्यर्पणाचे प्रकरण प्रलंबित आहे. दुसरीकडे नीरव मोदीचे प्रकरण आर्थिक घोटाळा आणि मालमत्ता हडपण्याचे आहे. त्याने पीएनबीकडून घेतलेले कर्ज केवळ बुडवलेच नाही तर बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतातीलच नव्हेतर विदेशातील बँकांनाही गंडवल आहे.

नीरवचे प्रताप

नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी हमीपत्र (एलओयू) प्राप्त केले आणि परदेशात पीएनबीला कोटय़वधी रुपयांनी गंडवले. एवढेच नव्हेतर त्याने देशात अनेक बनावट कंपन्या तयार केल्या. बनावट संचालक दर्शवून बँकांना लुबाडले होते.

राजकीय पडसाद

नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाल्यावर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणात  काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यात  या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, नीरव मोदी यांना अटक करणे ही सरकारची कामगिरी आहे. परंतु त्याला पळू कोणी दिले े, हा खरा सवाल आहे. ऑगस्टा वेस्ट लँड प्रकरणातील ख्रिश्चयन मिशेल प्रमाणे नीरव मोदी  याचे प्रत्यर्पण होईल. अशाप्रकारे मोदी सरकार सर्व चोरांना  तुरुंगात टाकेल, असे  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:24 am

Web Title: pnb scam accused nirav modi arrested in london
Next Stories
1 तब्बल ३ कोटी लोकांनी रोजगार गमावला
2 ६८ जणांचा मृत्यू झाला, याला कोणीच जबाबदार नाही; समझोता एक्स्प्रेस बॉंबस्फोट निकालावर ओवेसी नाराज
3 शिवसेनेचे धवलसिंह मोहिते-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट
Just Now!
X