News Flash

नीरव मोदीला दणका, देश- विदेशातील ६३७ कोटींच्या संपत्तीवर टाच

दक्षिण मुंबईतील नीरव मोदीच्या बहिणीच्या नावावर असलेले १९.५ कोटी रुपयांचे घर ईडीने जप्त केले आहे. २०१७ मध्ये हे आलिशान घर खरेदी करण्यात आले होते.

नीरव मोदीला दणका, देश- विदेशातील ६३७ कोटींच्या संपत्तीवर टाच
(नीरव मोदी)

पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) सुमारे १३ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका दिला. ईडीने नीरव मोदीच्या ६३७ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

हाँगकाँगमधून २२. ६९ कोटी रुपयांचे दागिने व हिरे, दक्षिण मुंबईतील नीरव मोदीच्या बहिणीच्या नावावर असलेले १९.५ कोटी रुपयांचे घर ईडीने जप्त केले आहे. २०१७ मध्ये हे आलिशान घर खरेदी करण्यात आले होते. नीरव मोदीची बहिण पुर्वी मोदी व तिच्या पतीच्या सिंगापूरमधील कंपनीचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. यात सुमारे ४४ कोटी रुपये आहेत. तसेच अन्य पाच बँक खातीही गोठवण्यात आली असून यात २७८ कोटी रुपये आहेत. याशिवाय लंडनमधील ५६. ९७ कोटी रुपये आणि न्यूयॉर्कमधील २१६ कोटी रुपयांची दोन घरंही जप्त करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी, त्याची अमेरिकी पत्नी अमी मोदी, बेल्जियन नागरिक असलेला भाऊ निशाल मोदी व मामा मेहुल चोकसी यांच्यासह अन्य कर्मचारी व बँकेचे अधिकारी आरोपी आहेत. मुंबईतील सीबीआय न्यायालयात नीरव मोदी याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून काही महिन्यांपूर्वी सीबीआयच्या विनंतीवरून इंटरपोलने त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2018 10:21 am

Web Title: pnb scam enforcement directorate attaches properties of rs 637 crore in nirav modi case
Next Stories
1 फक्त आरक्षणामुळे देशाचे भले होणार नाही: लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन
2 राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचं निधन
3 बदला घेण्यासाठी एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहितेच्या मुलीवर केला बलात्कार
Just Now!
X