News Flash

मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार?; स्थानिक पोलिसांकडून शोध सुरु

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावल्यानंतर मेहुल चोक्सी भारतातून फरार आहे

संग्रहित

पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झालेला मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार झाला आहे. नीरव मोदीचा मामा आणि गीतांजली जेम्सचा प्रमोटर मेहुल चोक्सी अँटिग्वामधून फरार होऊन क्युबामध्ये गेला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अँटिग्वा पोलिसांनी याप्रकरणी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. भारतातून फरार झाल्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वा आणि बारबुडा या देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

“पोलीस सध्या भारतीय व्यवसायिक मेहुल चोक्सी जे बेपत्ता झाल्याचं सागंण्यात येत आहे त्याची माहिती घेत आहेत,” असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं असल्याचं वृत्त Antiguanewsroom या स्थानिक प्रसारमाध्यमाकडून देण्यात आली आहे. मेहुल चोक्सीला रविवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरातून बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. जॉन्सन पॉइंट पोलीस ठाण्याने मेहुल चोक्सी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी लोकांना मेहुल चोक्सीला पाहिलं असल्यास माहिती देण्याचं आवाहन केलं आहे.

इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल चोक्सी अँटिग्वा येथून क्युबा येथे गेला असल्याची शक्यता आहे. तिथे त्याची संपत्ती आहे. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, मेहुल चोक्सीच्या सहकाऱ्याने सांगितलं आहे की, “मेहुल चोक्सीने देश सोडला असून सध्या तो क्युबा येथील त्याच्या अलिशान घऱात वास्तव्यास असल्याची शक्यता आहे”.

भारत सरकार नागरिकत्व रद्द करण्यासाठी अँटिग्वा सरकारवर दबाव आणत असल्याने मेहुल चोक्सी देश सोडूम फरार झाल्याची शक्यता आहे. त्याच्याकडे अँटिग्वासोबत आणखी एका कॅरिबियन देशाचं नागरिकत्व असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी
सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 9:14 am

Web Title: pnb scam mehul choksi may have fled antigua and reached cuba sgy 87
Next Stories
1 “लस घेऊनही स्वतःला वाचवू शकले नाहीत, १००० मेलेत… हे कसले डॉक्टर”; रामदेव यांचे आणखीन एक वादग्रस्त विधान
2 “करोनाची दुसरी लाट चीनमुळे; मोदींनी आव्हान दिल्यामुळेच केला व्हायरल हल्ला”
3 जनमत सर्वेक्षण: मोदी 2.0 सरकारची दोन वर्षे, मांडा तुमचं मत
Just Now!
X