पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी हे दोघे फरार झाले. त्यानंतर मेहुल चोक्सीने अँटिग्वामध्ये आश्रय घेतला. नीरव मोदी लंडन येथील जेलमध्ये आहे. अँटिग्वा सरकारने मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द करण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे भारताने टाकलेल्या दबावतंत्राला यश येऊ शकतं. ज्यामुळे लवकरच त्याचं प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं. चोक्सी याचं नागरिकत्व रद्द करणार असल्याचं अँटिग्वाच्या पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं आहेत.

मेहुल चोक्सीचं नागरिकत्व रद्द कर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला लवकरच भारताच्या ताब्यात दिलं जाईल असंही ब्राऊन यांनीम्हटलं आहे. कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नाही असे ब्राऊन यांनी म्हटलं आहे. पीएनबीमध्ये १३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी या दोघांवर आहे. २०१८ मध्ये हे प्रकरण उघडकीस आलं, तेव्हा हा घोटाळा उघडकीस आला. यावरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले. आता मात्र अँटिग्वा सरकार मेहुल चोक्सीचे नागरिकत्वच काढून घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दबावतंत्राला यश येतं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

आम्ही गुन्हेगारांना संरक्षण देणार नाही असं अँटिग्वाचे पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं आहे. सध्या मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आमचा देश म्हणजे घोटाळेबाजांसाठी सुरक्षित देश असं मुळीच नाही. कायदेशीर प्रक्रिया संपल्यानंतर त्याचे प्रत्यार्पण करता येणे शक्य आहे असेही संकेत ब्राऊन यांनी दिले आहेत.