News Flash

नीरव मोदीचा १३०० कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा उघडकीस

पीएनबीचा घोटाळा आता १२६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.

नीरव मोदीचा १३०० कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा उघडकीस
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी

पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) हिऱ्याचा व्यापारी नीरव मोदीचा १३२२ कोटींचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणला आहे. पीएनबीने सोमवारी रात्री उशिरा स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि त्याचा व्यावसायिक भागीदार मेहुल चोक्सी यांनी २०४ मिलियन डॉलर म्हणजे १३२२ कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली. या नव्या घोटाळ्यामुळे नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सीचा घोटाळा हा १२६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे.

यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर ११४०० कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. नीरव मोदीने केलेल्या या अवैध व्यवहाराचे मूल्य हे पीएनबीच्या वर्ष २०१७ च्या एकूण फायद्याएवढे आहे. वर्ष २०१७मध्ये सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पीएनबीला १३२० कोटी रूपयांचा फायदा झाला होता. बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला.

नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा २०४ मिलियन डॉलर म्हणजेच १२६०० कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे, असे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले. अन्य एका फायलिंगमध्ये पीएनबीने या घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केल्याचे फेटाळले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2018 2:55 pm

Web Title: pnb scam nirav modi mehul choksi pnb reveals another 1322 crore fraud
Next Stories
1 ‘भारतीय मेहनत करतात, मर्सिडिझ घेतात पण नवनिर्मितीचे काय?’
2 कर्नाटकात पहिलीपासून कन्नड सक्तिची झाली, महाराष्ट्रात मायमराठी होणार का?
3 श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण कळताच श्रद्धांजलीच्या यादीतून वगळले नाव
Just Now!
X