News Flash

सलमाननेच केली काळवीटाची शिकार, बेपत्ता साक्षीदाराची माहिती

धमक्यामुळे या प्रकरणात दिली नव्हती साक्ष

१८ वर्षांपूर्वी काळवीट शिकार प्रकरणात सलमानविरुद्ध साक्ष दिलेला आणि काही वर्षांपासून बेपत्ता असलेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणात हा चालक अत्यंत महत्त्वाचा साक्षीदार होता. बुधवारी अचानक माध्यमासमोर येत त्याने गौप्यस्फोट केलाय. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणात साक्ष दिल्यामुळे आपल्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात होत्या. धमक्यामुळे आपण अज्ञात स्थळी राहत होतो. जर पोलिसांनी सुरक्षा दिली असती तर मी आज साक्ष दिली असती अशी माहिती त्याने दिली. हरिष दुलानी असे या साक्षीदाराचे नाव आहे. १९९८ मध्ये सलमान ज्या जीपने शिकारीला गेला होता त्या जीपचे हरिष हे चालक होते. यावेळी सलमान खानच जीप चालवत होते असेही त्यांनी १९९८ मधल्या साक्षीत म्हटले होते. पण २००२ पासून ते बेपत्ता होते.
या शिकार प्रकरणात सोमवारी २५ जुलैला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायलयाने सलमान खान याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. या प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्यायलायने या साक्षीदाराने आधी दिलेली साक्ष ग्राह्य धरली नव्हती. १९९८ मध्ये सीआरपीटी कलम १६४ प्रमाणे त्याने विशेष दंडाधिका-यांसमोर साक्ष नोंदवली होती. त्याच्या साक्षीवरून कदाचित सलमानला काळवीट शिकार प्रकरणात शिक्षा झाली असती पण २००२ मध्ये या प्रकरणातील सुनावणीदरम्यान तो न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे या साक्षीदाराने आधी दिलेली साक्ष ही विश्वासहार्य नसल्याचे न्यायलयाने सुनावणी दरम्यान म्हटले होते. तसेच २००२ मधे झालेल्या सुनावणी दरम्यान त्याची अनुपस्थितीही न्यायालयाने अधोरेखित केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 9:30 am

Web Title: poaching cases against salman khan key witness reappears
Next Stories
1 वस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे!
2 एमआयएम प्रमुख ओवेसी यांना समन्स
3 अमेरिकेतील निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप
Just Now!
X