News Flash

Video: अटलजींच्या कविता, त्यांच्याच आवाजात…

परिस्थितीवर मार्मिक भाष्य करण्याची प्रतिभेची उत्तम देणं अटजींकडे होतं

अटलबिहारी वाजपेयी

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान याबरोबरच अटलबिहारी वाजपेयी यांची आज ९५ वी जंयती. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील एक प्रमुख नेता याबरोबरच अटलजींची आणखी एक महत्त्वाची ओळख होती. राजकारणासारख्या क्षेत्रात असूनही कवी मनाचा असलेला हा नेता त्याच्या कवितांसाठीही तितकाच प्रसिद्ध होता. आपल्या ओघवत्या शैलीत त्यांनी जाहीर कार्यक्रमात अटलजींनी आपल्या काही कविता सादरही केल्या आहेत. या सादरीकरणातही असणारी जान आणि त्यामुळे त्यांच्या भाषणाला प्राप्त होणारे वेगळे महत्त्व हे का.मच आकर्षणाचा बिंदू ठरत असे. त्यांच्या या कवितांमुळे त्यांचे साहित्याचे ज्ञान, हिंदीवर असेलेले प्रभुत्व आणि त्यांची प्रतिभा यांचे दर्शन आपल्याला अनेकदा झाले. वेगवेगळ्या निमित्ताने विशिष्ट विषयावर त्यांनी केलेले मार्मिक भाष्य आपल्याला विचार करायला लावते. अशाच त्यांच्या काही कविता त्यांच्याच आवाजात…

अमर आग है…

आज सिंधु मे ज्वर उठा है…

मस्तक नही झुकेगा…

कदम मिलाकर चलना होगा…

आज अटलजींच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून त्यांच्या नावाने वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 8:39 am

Web Title: poems of atal bihari vajpayee in his own voice scsg 91
Next Stories
1 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंती: जाणून घ्या कोणते होते त्यांचे ५ महत्त्वपूर्ण निर्णय
2 राहुल गांधी, प्रियांका गांधी हे पेट्रोल बॉम्ब; भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
3 अमित शहांचे घूमजाव!
Just Now!
X