09 March 2021

News Flash

वरवरा राव यांच्या कन्येच्या कुंकवाची पोलिसांना काळजी!

वरवरा राव यांच्या कन्येच्या घरीही छापे घातले.

के. सत्यनारायण

पुणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी विद्रोही कवी वरवरा राव यांच्या कन्येच्या घरीही छापे घातले. या छाप्यादरम्यान एका अधिकाऱ्याने त्यांच्या कन्येला विचारलेल्या प्रश्नांबाबतही चीड व्यक्त होत आहे. वरवरा राव यांची कन्या पवना यांचा प्रा. के. सत्यनारायण यांच्याशी विवाह झाला आहे. सत्यनारायण  हैदराबादमधील आंग्ल आणि परकीय भाषा विद्यापीठाच्या सांस्कृतिक अध्ययन विभागाचे प्रमुख आहेत. पवना यांच्या घरी झडतीदरम्यान एका अधिकाऱ्याने पवना यांना विचारले की, ‘‘तुमचा पती दलित आहे, पण तुम्ही ब्राह्मण आहात. तरीही तुम्ही गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळी कुंकू का लावलेले नाही? पत्नीला शोभेल असा पारंपरिक पेहराव का केलेला नाही? का मुलीनेही वडिलांसारखेच असले पाहिजे?’’

या सर्व झडतीबद्दल तीव्र प्रतिक्रिया देताना सत्यनारायण म्हणाले की, पुणे आणि तेलंगण पोलिसांच्या पथकाने सकाळी साडेआठपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत घरातील सर्व कपाटांतील सामानाची उलथापालथ केली. माझे माओवाद्यांशी संबंध असल्याचा पुरावा त्यांना हवा होता. त्यांनी माझ्या पत्नीला अनेक बालिश आणि अवमानकारक प्रश्न विचारले. हा अनुभव अपमानजनक होता.

तुमच्याकडे इतकी पुस्तकं का? चीनमध्ये छापलेली पुस्तकं का? माओ आणि मार्क्‍सची पुस्तकं का आहेत? देवांच्या तसबिरी नाहीत, पण फुले-आंबेडकर यांच्या तसबिरी का आहेत, असे प्रश्नही पोलिसांनी विचारल्याचे सत्यनारायण यांनी सांगितले. कळस म्हणजे लाल रंगाचे मुखपृष्ठ असलेल्या प्रत्येक पुस्तकावरूनही त्यांची चौकशी केली गेली!

पोलिसांनी माझा वीस वर्षांचा साहित्यिकसंग्रह आणि नोंदी, दोन पुस्तकांची हस्तलिखिते, काही प्रबंध आणि मुलांना शिकवण्यासाठी तब्बल ५० पुस्तकांतील महत्त्वाची माहिती संग्रहित केलेली हार्डडिस्क हे सारे हस्तगत केले. हे सगळे मला परत कधी मिळेल, असे विचारता त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष येऊन अर्ज द्यावा लागेल, असे सांगण्यात आले, असेही सत्यनारायण म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:58 am

Web Title: poet varavara rao k satyanarayana
Next Stories
1 लोकशाहीत मतभिन्नता स्वाभाविक, ती दडपली तर स्फोट होईल : सर्वोच्च न्यायालय
2 नॅशनल कॉन्फरन्सबरोबर भाजपचा घरोबा?
3 नोटाबंदीची खूप मोठी किंमत देशाला मोजावी लागली- पी. चिदंबरम
Just Now!
X