सोशल मीडियावर नेटकरांना केव्हा कोणत्या विषयाची उसंत येईल याचा काहीच नेम नाही. ट्विटवर सध्या नेटकर विश्व पोहा दिवस साजरा करत आहेत. रविवार सकाळपासून ट्विटवर विश्व_पोहा_दिवस हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. चविष्ट पोहे मिळण्याची ठिकाणे आणि अनुभव ट्विटरकर शेअर करत आहेत. तर काहींनी या ट्रेंडबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. विश्व पोहा दिवसाच्या हॅशटॅगला मॅगीच्या वादाचीही फोडणी नेटकरांनी दिली आहे. मॅगीवर आज पोहा पडला भारी पडल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर व्यक्त होत आहे, तर काहींनी राहुल गांधी मॅगीचे तर नरेंद्र मोदी पोह्याचे प्रतिनिधीत्व करत असल्याचे दाखवून दोघांमध्ये युद्ध सुरू असल्याचे छायाचित्र शेअर केले आहे. काहींतर थेट ‘राईट टू पोहा’ कायदा आणण्याची मागणी देखील केली आहे.

काही ट्विट्स-