25 September 2020

News Flash

बिहारमध्ये विषारी दारूचे आठ बळी

विषारी दारू प्यायल्यामुळे गया जिल्ह्य़ात सोमवारी आठ जणांचा बळी गेला आहे. बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या दारूमुळे विषबाधा होऊन गेल्या महिन्याभरात मरण पावलेल्यांची संख्या आता २८ वर

| December 12, 2012 03:27 am

विषारी दारू प्यायल्यामुळे गया जिल्ह्य़ात सोमवारी आठ जणांचा बळी गेला आहे. बेकायदेशीररीत्या विकल्या जाणाऱ्या दारूमुळे विषबाधा होऊन गेल्या महिन्याभरात मरण पावलेल्यांची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.
सोमवारी रामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारूमुळे सातजण मरण पावले तर चेरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे प्रकृती बिघडलेल्या चार जणांना अनुगड नारायण मगध वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती उपपोलीस अधीक्षक राकेश दुबे यांनी दिली. बिहारचे पोलीस महासंचालक अभयानंद यांनी मगध विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक नायर हुसैन यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2012 3:27 am

Web Title: poison liquor killed eight person in bihar
टॅग Bihar
Next Stories
1 ‘तौतातीस’उल्का गेली पृथ्वीजवळून
2 ‘वॉलमार्ट लॉबिंग’ प्रकरणाची न्‍यायालयीन चौकशीची सरकारची घोषणा
3 वॉलमार्टने लॉबिंगच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही – अमेरिका
Just Now!
X