28 October 2020

News Flash

जम्मूत पोलिसांना सापडली ड्रोनच्या मदतीने पाडली गेलेली शस्त्रं

अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसाठा हस्तगत

जम्मूमधील सीमावर्ती भागातील अखनूर सेक्टरमध्ये पोलीस व लष्करी जवानांच्या संयुक्त पथकाने, ड्रोनच्या मदतीने पाडण्यात आलेली शस्त्रांची पाकीटं जप्त केली आहेत. या पाकिटांमध्ये पोलिसांना दोन एके-47 असॉल्ट रायफल, तीन एके मॅगझीन, एके 7.62 अॅम्युनेशची ९० जिवंत काडतूसं आणि एक पिस्तुल आढळलं आहे.

दोन दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवरील अंमलीपदार्थांसह शस्त्रांच्या तस्करीचा व घुसखोरीचा डाव उधळून लावला होता. या कारवाईत अंमलीपदार्थांच्या साठ्याबरोबरच मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला होता.

भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, यासाठी दहशतवाद्यांना देखील पाठबळ दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानचे हे प्रयत्न प्रत्येक वेळी अयशस्वी ठरवण्यात भारतीय जवानांना यश येत आहे. शिवाय, घुसखोरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी व घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता भारताकडून ‘एलओसी’वर अतिरिक्त तीन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 4:02 pm

Web Title: police and army have recovered drone dropped packages in the border area of akhnoor sector msr 87
Next Stories
1 NDA म्हणजे No Data Available; आकडेवारीवरुन काँग्रेस खासदाराचा केंद्राला टोला
2 मुंबई पोलीस शांत का?; कलाविश्वातील घडामोडींवर रुपा गांगुली यांची आगपाखड
3 इथेपण खोटेपणा, चिनी एअरफोर्सच्या व्हिडीओमध्ये हॉलिवूडच्या क्लिप्स
Just Now!
X