News Flash

१९ हजार किलो पिस्ता चोरणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

१९ हजार किलो पिस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती

१९ हजार किलो पिस्ता चोरणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

कॅलिफोर्निया पोलिसांनी एका पिस्ता चोराला अटक केली आहे. १९ हजार किलो पिस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. दरम्यान, चोरी आणि विक्रीच्या आरोपाखाली पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. चोरी केलेला पिस्ता एक लाख डॉलर्सला विकण्यापूर्वीच आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

चोरी झालेला पिस्ता जवळच्याच एका पार्किंग क्षेत्रात सापडला होता आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सापडला, असे शनिवारी तुलार परिसरातील शेरीफच्या कार्यालयाने घोषित केले. या महिन्याच्या सुरुवातीस सेंट्रल कॅलिफोर्नियास्थित पिस्ता कंपनीच्या नित्याच्या ऑडिटमध्ये पिस्ता गायब झाल्याची माहिती समोर आली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना १९ हजार किलो पिस्ता हरवल्याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पुर्ण करत एकाला अटक केली आहे.

हेही वाचा- VIDEO: पाहा १८ हजार किलोचा वजनाचा बॉम्ब समुद्रात फुटतो तेव्हा काय होतं

चोराची पिस्ता लहान पिशव्यांमध्ये पुन्हा विकण्याची योजना होती. तपासादरम्यान, ३४ वर्षीय ट्रक चालक अल्बर्ट माँटेमॉयोर याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात सामील असलेल्या सरकारी संस्थांनी पिस्ता चोरीसंदर्भात सर्व माहिती देण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये ठेवलेला पिस्ता टस्स्टोन कंपनीला परत करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 1:31 pm

Web Title: police arrest 19 thousand kg pistachio thief srk 94
Next Stories
1 सुप्रीम कोर्टात हे असं होत असेल तर देवच आपल्याला वाचवू शकतो : कपिल सिब्बल
2 पाकिस्तान : दहशतवादी हाफिज सईदच्या घराबाहेर स्फोट; दोघांचा मृत्यू , १७ जखमी
3 Facebook, Whatsapp ला पाठवलेल्या त्या नोटिसीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
Just Now!
X