News Flash

ममता बॅनर्जींचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला अटक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्या प्रकरणी जिल्हा पोलिसांनी बाबुया घोष या तरुणाला अटक केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह फोटो पोस्ट केल्या प्रकरणी जिल्हा पोलिसांनी बाबुया घोष या तरुणाला अटक केली आहे. पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात राहाणारा बाबुया भाजपाचा सक्रीय कार्यकर्ता असून त्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आक्षेपार्ह फोटो आणि काही कमेंटस पोस्ट केल्या होत्या.

बाबुयाने बंगाली लेख आणि ममता बॅनर्जींचे मॉर्फ केलेले फोटो शेअर केले. योग्य वयात लग्न केले नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतात असे बाबुयाने शेअर केलेल्या लेखात म्हटले होते.

योग्य वयात लग्न झाले नाही तर माणूस वेडा होतो. मुलीचे योग्य वयात लग्न झाले नाही तर काय होते हे संपूर्ण पश्चिम बंगाल पाहत आहे असे बाबुयाने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले होते. त्याने ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यासोबत ममता बॅनर्जींचे काही मीम्सही शेअर केले. पोलिसांनी बाबुया घोषला अटक केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 12:45 pm

Web Title: police arrest bjp activist for sharing objectionable photos of mamta banerjee
टॅग : Bjp
Next Stories
1 चॅटिंग होणार आणखी सोपं, व्हॉट्स अॅपचे दोन नवे फिचर
2 मी अमित शाहंचं नावही नाही घेतलं, सीबीआयनं ते घुसडलं – सोहराबुद्दिन शेखचा भाऊ
3 ८वी पास आमदारांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख
Just Now!
X