News Flash

आमदारपुत्र सिद्धार्थचे पाचपट जास्त मद्यप्राशन!

सिद्धार्थ महारिया हा राजस्थानातील फतेहपूरचे अपक्ष आमदार नंदकिशोर महारिया यांचा पुत्र आहे.

| July 4, 2016 12:12 am

भरधाव वेगाने मोटार हाकून तिघाजणांचा जीव घेणाऱ्या राजस्थानमधील आमदारपुत्राने प्रमाणापेक्षा पाचपट अधिक मद्यप्राशन केल्याचे पोलीस अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याला एक आठवडय़ाची पोलीस कोठडी देण्यात आली.

सिद्धार्थ महारिया हा राजस्थानातील फतेहपूरचे अपक्ष आमदार नंदकिशोर महारिया यांचा पुत्र आहे. शनिवारी त्याने आपली आलिशान बीएमडब्ल्यू मोटार भरधाव वेगाने हाकत एक ऑटोरिक्षा व पोलिसांच्या वाहनाला जबरदस्त धडक दिली. यात तीनजण ठार, तर पाचजण जखमी झाले. पोलिसांनी अपघातानंतर लगेच घेतलेल्या चाचणीत सिद्धार्थने प्रमाणापेक्षा पाचपट अधिक मद्यप्राशन केल्याचे आढळले असून, अपघाताच्या वेळी तो ताशी सुमारे १०० किलोमीटर वेगाने मोटार चालवत होता असेही उघड झाले आहे. या अपघातात रिक्षातील ४ जणांपैकी तिघांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. पोलिसांच्या वाहनातील एका उपनिरीक्षकासह चार पोलीसही जखमी झाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 12:12 am

Web Title: police arrest mlas son siddharth whose bmw crushed three to death
Next Stories
1 विवरणपत्र सादर न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दंड
2 पेट्रोलियम पदार्थावरील अबकारी करामध्ये वाढीची शक्यता कमी
3 उत्तर प्रदेशातील कैरानात चित्रपटगृह मालकाचे पैसे लुटले
Just Now!
X