श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांच्या सामुग्रीसह अटक केली आहे. या सर्वांनी प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.


अटक केलेल्या या दहशतवाद्यांकडून पोलिसांनी स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामुग्री जप्त केली आहे. प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये मोठा घातपात करण्याचा यांचा डाव होता.

अटक करण्यात आलेल्य दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. हे दहशतवादी जैश एक मोहम्मद या दहशतावादी संघटनेचे आहेत. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारीला घातपात घडवण्याचा कट या सगळ्यांनी रचला होता. स्फोट घडवून आणण्यासाठी आणलेल्या जिलेटीनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. हे दहशतवादी हजरतबल परिसरात दोन ग्रेनेड हल्ले करण्याच्या विचारात होते असंही पोलिसांनी म्हटलं आहे.