News Flash

दाऊदची माहिती मिळविण्यात पोलीस अपयशी

आरोपीला केवळ चार दिवसांची पोलीस कोठडी

दाऊद इब्राहिम

आरोपीला केवळ चार दिवसांची पोलीस कोठडी

कुख्यात आंतरराष्ट्रीय माफिया दाऊद इब्राहिमचा मुंबईतील विश्वासू साथीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारिक अब्दुल करीम परवीन याला वीस वर्षांपूर्वी घडलेल्या दुहेरी खूनप्रकरणात ठाणे पोलिसांनी गेल्या आठवडय़ात अटक केली होती. तपासामध्ये त्याच्याकडून दाऊदसंबंधीची माहिती मिळवण्यात पोलीस अपयशी ठरले असून यामुळे मुंब्रा पोलिसांच्या कार्यपद्घतीवर आणि तपासावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. त्यामुळे तारिकची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

मुंब्रा येथील किस्मत कॉलनी परिसरात मोहम्मद इब्राहिम बांगडीवाला आणि त्याचा मित्र परवेज अन्सारी या दोघांची वीस वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खूनप्रकरणी सहा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांची निर्दोष सुटका झाली होती. मात्र, या गुन्ह्य़ात तारिक परवीन हा फरारी होता. तब्बल वीस वर्षांनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने त्याला पकडून मुंब्रा पोलिसांच्या हवाली केले. मुंब्रा पोलिसांनी त्याला अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळविली होती. दाऊदच्या सारा सहारा या वादग्रस्त शॉपींग कॉम्प्लेक्स प्रकरणात तारिक आरोपी असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

तसेच दाऊदचा मुंबईतील रिअल इस्टेटचा व्यवहार तारिक सांभाळत असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे या व्यवहारासंबंधीची काही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्याशी संपर्क साधला असता, मुंब्य्रातील खूनप्रकरणामध्ये तारिक आरोपी असल्यामुळे त्याच्याकडे या खुनाबाबत चौकशी करण्यात आली. तसेच त्याच्याकडून दाऊदसंदर्भात काहीच माहिती मिळू शकलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 1:49 am

Web Title: police failure to get dawoods information
Next Stories
1 नवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय
2 निसर्गाच्या कुशीत ठाणेकरांचे आरोग्य धडे!
3 वालधुनीच्या पात्रात विषाचा पूर