News Flash

खळबळजनक! कसाई निघाला सीरियल किलर, घरात सापडली ३,७८७ मानवी हाडे

उत्तर अमेरिकेत असलेल्या मॅक्सिकोमध्ये एका नरभक्षक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.

Police Find 3787 Bone Fragments at Mexico Serial Killer Suspect Home
खळबळजनक! कसाई निघाला सिरियल किलर, घरात सापडले ३,७८७ मानवी हाडे ( photo indian express)

उत्तर अमेरिकेत असलेल्या मॅक्सिकोमध्ये एका नरभक्षक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मॅक्सिकोत खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात दहशत पसरली आहे. एका आरोपीच्या घरात झालेल्या तपासणीत चक्क ३,७८७ मानवी हाडे सापडली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. हा नरभक्षक सिरीयल किलर पेशाने कसाई म्हणून काम करायचा आणि संधी मिळताच लोकांना ठार मारायचा.

द सन मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार नरभक्षक मारेकऱ्याचे नाव अँड्रेस असून तो पेशाने कसाई होता. पोलिसांनी सांगितले की, आरोपी संधी मिळताच लोकांना आपले बळी बनवायचा. सीरियल किलरच्या घरी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने सुमारे २० बेपत्ता लोकांचे अवशेष शोधून काढत हजारो हाडे मिळवल्याचा दावा केला आहे.

नरभक्षक अँड्रेस यांच्या घरात ही हाडे कॉंक्रीटच्या फरशीखाली सापडली. यासाठी मृतदेहांचे अगदी लहान तुकडे केले गेले असल्याचे . फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी सांगितले.

असा आला आरोपीवर पोलिसांना संशय

अँड्रेस राहत असलेल्या अपार्टमेंट मध्ये पोलीस आणखी खोदकाम करणार आहे. आरोपीच्या घरातून गायब झालेल्या लोकांची ओळखपत्रे, कपडे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यामुळे हे स्पष्ट झाले की आरोपी बराच काळापासून अशा प्रकारचे गुन्हे करीत होता. आरोपी मारेकरी पकडला गेला कारण त्याने पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचालाच शिकार केले. त्यांना तो वैयक्तिक ओळखत होता. पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आरोपी सीरियल किलर अँड्रेसबरोबर शॉपिंग ट्रिपवर गेली होती आणि त्याच दिवशी ती गायब झाली. पत्नी परत आली नसल्यामुळे तिच्या पतीला आरोपीवर संशय आला.

आरोपीचे न्यायालयात नाटक

आरोपीला पोलिसांनी पुराव्यासोबत न्यायालयात हजर केले. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, आरोपीने एका महिलेला सुंदर दिसत असल्यामुळे मारले. ४ तास चाललेल्या सुनावणी दरम्यान आरोपीने आजारी असल्याचे नाटक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2021 12:22 pm

Web Title: police find 3787 bone fragments at mexico serial killer suspect home srk 94
टॅग : Crime News
Next Stories
1 राम जन्मभूमी जमीन खरेदी भ्रष्टाचार; ट्रस्टनं आरोप फेटाळले, केला खुलासा…
2 Good News: ७२ दिवसांमधल्या सर्वात कमी करोना बाधितांची नोंद
3 Anti Conversion Law: महिलेचं धर्मांतर करणाऱ्या तिघांना अटक
Just Now!
X