31 May 2020

News Flash

बिहारमधील अपहृत मुख्याध्यापकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश

राजन बिंड टोळीच्या सात सदस्यांनी २४ तास त्यांना लाडिया आणि खरागपूर गावाच्या दरम्यान अपहरण करून ओलीस ठेवले होते.

खंडणीसाठी अपहरण केलेल्या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाची रविवारी बिहारच्या मुंगेर जिल्ह्य़ातील खरगपूरमधून सुटका करण्यात आली.
मुंगेर पोलीस आणि विशेष कृती दला(एसटीएफ)च्या संयुक्त कारवाईत बेजलपूरच्या सरकारी शाळेचे मुख्याध्यापक सुबोध सहा यांची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त वरुण कुमार सिन्हा यांनी दिली. खंडणीसाठी ५० वर्षांच्या सहा यांचे सरकारी निवासस्थानावरून शनिवारी अपहरण केले गेले होते. राजन बिंड टोळीच्या सात सदस्यांनी २४ तास त्यांना लाडिया आणि खरागपूर गावाच्या दरम्यान अपहरण करून ओलीस ठेवले होते. पोलिसांनी शिक्षकांच्या अपहरणात प्रावीण्य असलेल्या टोळीच्या सदस्यांमधील मोबाईल संभाषणावर पाळत ठेवताना अपहरणकर्त्यांचा शोध लावल्याची माहिती सिन्हा यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2015 12:45 am

Web Title: police find kidnapped principal
Next Stories
1 मनोरुग्णालयातील आगीत २३ जणांचा करूण अंत
2 ‘आयसिस’च्या समर्थनार्थ घोषणा देणारे चौघे अटकेत
3 झोपडपट्टी हटविताना चिमुरड्याचा मृत्यू; केजरीवालांनी तीन अधिका-यांना केले निलंबित
Just Now!
X