25 October 2020

News Flash

भाजप आमदाराने मारहाण केलेल्या ‘शक्तिमान’चा मृत्यू

काही दिवसांपूर्वीच शक्तिमान कृत्रिम पायाच्या साह्याने दौडण्यास सिद्ध झाला होता

संग्रहित छायाचित्र

भाजप आमदाराच्या मारहाणीत जखमी होऊन पाय गमवावा लागलेल्या शक्तिमान अश्वाचा बुधवारी मृत्यू झाला. शक्तिमानच्या मृत्यूमुळे उत्तराखंड पोलीस दल आणि प्राणीप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. काही दिवसांपूर्वीच शक्तिमान कृत्रिम पायाच्या साह्याने दौडण्यास सिद्ध झाला होता. डेहराडूनच्या पोलीस लाइन्समध्ये शक्तिमान या अश्वाला कृत्रिम पाय बसविण्यात आला होता. त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले होते.
डेहराडूनमध्ये एका निषेध मोर्चावेळी पोलीस दलातील शक्तिमान या उमद्या घोडय़ाला क्रूरपणे भाजप आमदार गणेश जोशी यांनी मारहाण केली होती. जोशी यांनी घोडय़ास काठीने मारहाण केल्याने तो जखमी झाला व त्यामुळे त्याचा पाय तोडावा लागला होता. शक्तिमानवर शस्त्रक्रिया करून त्याला कृत्रिम पाय बसविण्यात आला होता. त्यावर तो उभाही राहिला होता. पण बुधवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात गणेश जोशी यांना अटकही करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 6:19 pm

Web Title: police horse shaktiman which was injured during a bjp protest in dehradun dies
Next Stories
1 राष्ट्रपती राजवट लादण्यासाठी संधी शोधत राहणार का, हायकोर्टाचे केंद्रावर ताशेरे
2 डिस्कोथेकमधील मुलींच्या तोकड्या कपड्यांवर चंदीगढमध्ये बंदी
3 INS निरीक्षक युद्धनौकेवर सिलिंडरचा स्फोट, तीन जण जखमी
Just Now!
X