27 February 2021

News Flash

उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड पोलीस चकमकीत ठार

कबीर चौरा मठ परिसरातील शासकीय रुग्णालयाच्या संकुलात विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चकमकीत एक कुख्यात गुंड ठार झाला

| July 31, 2015 02:03 am

येथील कबीर चौरा मठ परिसरातील शासकीय रुग्णालयाच्या संकुलात विशेष कृती दलाच्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चकमकीत एक कुख्यात गुंड ठार झाला. त्याच्यावर ५० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
सदर गुंडाचे नाव रोहित ऊर्फ सनी सिंह असे असून तो अन्य टोळीतील गुंडांना भेटण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या संकुलात आल्याची खबर पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलिसांनी या संकुलास वेढा घातला त्या वेळी झालेल्या चकमकीत रोहित ठार झाला, असे पोलीस महानिरीक्षक (वाराणसी परिमंडळ) अमरेंद्र सेनगर यांनी सांगितले.
या चकमकीत विशेष कृतिदलाचा कॉन्स्टेबल आलोक जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या वेळी अन्य दोन गुंडांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुले आणि एक दुचाकी
हस्तगत करण्यात आली. सनी सिंह याच्यावर खून, दरोडा आदी गुन्हे
होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 2:03 am

Web Title: police killed uttar pradesh gangster
टॅग : Gangster
Next Stories
1 माहिती अधिकारातील शुल्कात सुसूत्रता ठेवण्याची केंद्राची मागणी
2 नव्या भूसंपादन विधेयकात शेतकऱ्यांच्या लाभात वाढ
3 मुल्ला अख्तर मन्सूर तालिबानचा म्होरक्या
Just Now!
X