11 July 2020

News Flash

राजस्थानमध्ये मुस्लीमधर्मीय पोलिसांना दाढी काढण्याबाबत दिलेले आदेश मागे

अल्वारमधील नऊ मुस्लीमधर्मीय पोलिसांना गुरुवारी दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

जयपूर : राजस्थानातील अल्वार जिल्हा पोलिसांनी दलातील नऊ मुस्लीमधर्मीय पोलिसांना दाढी काढण्याचे आदेश दिले होते, मात्र कालांतराने हा आदेश मागे घेण्यात आला. अल्वारमधील नऊ मुस्लीमधर्मीय पोलिसांना गुरुवारी दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले होते. दाढी काढल्यास ते नि:पक्षपाती दिसतील आणि तशी कृतीही करू शकतील, असे आदेशात म्हटले होते. मात्र याबाबतचे वृत्त पसरताच शुक्रवारी अल्वारच्या पोलीस अधीक्षकांनी स्वत:च जारी केलेला आदेश मागे घेतला. यापूर्वी ३२ मुस्लीमधर्मीय पोलिसांना दाढी वाढविण्याची मुभा देण्यात आली होती. गुरुवारी नऊ पोलिसांना दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले होते, तर उर्वरित २३ जणांना दाढी ठेवण्याची अनुमती देण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2019 2:49 am

Web Title: police withdraw order asking muslim policemen to shave beards zws 70
Next Stories
1 दहशतवाद्यांना फंडिंग केल्याचा आरोप असणाऱ्या कंपनीकडूनच भाजपाने घेतली १० कोटींची देणगी
2 चीनच्या नादाला लागू नका, अमेरिकेचा पाकिस्तानला सल्ला
3 देवभोळा चोर! आधी केली दुर्गादेवीची पूजा आणि मग चोरले दागिने
Just Now!
X