News Flash

तस्करांच्या गोळीबारात दोन पोलीस ठार

तस्करांना पकडण्यासाठी पोलीस पथकांनी शनिवारी रात्री निरनिराळ्या ठिकाणी अडथळे उभारले होते.

( प्रतिकात्मक छायाचित्र)

जयपूर : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात पोलिसांनी वेगवेगळ्या तपासणी नाक्यांवर थांबवल्यानंतर संशयित अंमली पदार्थ तस्करांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात दोन पोलीस शिपाई ठार झाले.

तस्करांना पकडण्यासाठी पोलीस पथकांनी शनिवारी रात्री निरनिराळ्या ठिकाणी अडथळे उभारले होते.  दोन जीप आणि दोन एसयूव्हीमधून प्रवास करणारे आरोपी कोटडी व रायला या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तपासणी नाके पार करत होते. सशस्त्र तस्करांनी आधी कोटडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पथकावर गोळीबार केला. यात ओंकार रायका नावाचा शिपाई जखमी होऊन नंतर मरण पावला. गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी नंतर जिल्ह्यात ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले. यावेळी रायला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपासणी नाके पार करताना आरोपींनी पुन्हा पोलिसांवर गोळीबार केला. यात पवन चौधरी हा शिपाई ठार झाला. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध हत्येचा, तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्यापासून रोखण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलो, मात्र अद्याप कुणालाही अटक केले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 1:20 am

Web Title: policemen killed in smuggler firing akp 94
Next Stories
1 वेगवेगळ्या लशींच्या मिश्रणातून परिणामकारकता वाढविण्याचा पर्याय 
2 ‘लसीकरण उत्सव’ हे  युद्धच- मोदी
3 देशात आणखी पाच लशी परवान्याच्या प्रतीक्षेत
Just Now!
X