News Flash

क्रिकेटनंतर राजकारणामध्येही दादागिरी?; सौरभ गांगुलीच्या त्या ‘अराजकीय’ भेटीनंतर चर्चांना उधाण

अमित शाहबरोबर आज दिसणार व्यासपीठावर

संग्रहित छायाचित्र

पश्चिम बंगालमध्ये राजकीय रणधुमाळीला अजून थोडासा अवकाश असला, तरी वातावरण मात्र तापू लागलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला रोखण्यासाठी भाजपाकडून पूर्णपणे शक्ती पणाला लावली जात असल्याचं नुकत्याच भाजपा नेत्यांनी केलेल्या दौऱ्यात दिसून आलं. मात्र, सध्या बंगालच्या राजकारणात चर्चा सुरू आहे ती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या नावाची. सौरव गांगुली बंगालच्या राजकीय मैदानात उतरणार असल्याच्या कारण ठरलं आहे, त्यांनी घेतलेली राज्यपालांची भेट.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात जोरदार राजकीय पेटलेलं असतानाच सौरव गांगुली यांनी राज्यपाल जयदीप धनकर यांची भेट घेतली. या भेटीविषयी राज्यपालांनी ट्विट करून माहिती दिली. राज्यपाल आणि सौरव गांगुली यांच्यातील ही भेट औपचारिक असल्याचं सांगण्यात आलं. पण, राजकीय वातावरणात चर्चा सुरू आहे, ती सौरव गांगुली यांच्या राजकारणात उतरण्याची.

सौरव गांगुली यांनी राज्यपाल जयदीप धनकर यांची रविवारी भेट घेतली. त्यानंतर राज्यपालांनी ट्विट करून बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांच्यासोबत राजभवनात विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. सौरव गांगुली यांनीही माध्यमांशी बोलताना ही औपचारिक भेट असल्याचा दावा केला. त्यातच आज सौरव गांगुली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. दिल्लीतील कोटला मैदानात माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या भेटीपासूनच सौरव गांगुली बंगालच्या राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बंगाल विधानसभा निवडणूक तोंडावर येत असतानाच ही भेट झाल्यानं सौरव गांगुली भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, अद्याप यावर भाजपा वा सौरव गांगुली यांच्याकडून कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2020 10:04 am

Web Title: political innings for dada sourav ganguly makes courtesy call to governor dhankar bmh 90
Next Stories
1 २८ वर्षीय पतीकडून ५१ वर्षीय पत्नीची हत्या; ख्रिसमची लाईटिंग पाहून रचला होता कट
2 युनायटेड किंग्डममध्ये अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्हीने २८० वेळा मागितली माफी
3 आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाही; जदयूचा भाजपाला इशारा!
Just Now!
X