26 February 2021

News Flash

‘फर्नांडिस यांनी भारताला सुरक्षित आणि शक्तीशाली बनवले’, मोदींनी वाहिली श्रद्धांजली

'आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू'

राजकीय नेत्यांनी ट्विटवरुन फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली

देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कामगार नेते, मुंबईच्या जनजीवनाशी जोडले गेलेले एकेकाळचे ‘बंदसम्राट’ अशी जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख होती. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर अन्य राजकीय नेत्यांनी ट्विटवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाहुयात कोण काय म्हणाले आहे फर्नांडिस यांच्या आठवणींना उजाळा देताना…

साधी रहाणी उच्च विचारसरणी: राष्ट्रपती

फर्नांडिस म्हणजे सर्वोत्तम नेतृत्व: नरेंद्र मोदी

त्यांनी भारताला सुरक्षित आणि शक्तीशाली बनवले: मोदी

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो: मोदी

शेवटच्या रांगेत उभे असणाऱ्यांसाठी लढणारा नेता गेला: नितीन गडकरी

गरिबांसाठी लढणारा नेता हरपला: राजनाथ सिंह

लोकांचा नेता: सुरेश प्रभू

कोकण रेल्वेचा शिल्पकार: सुरेश प्रभू

आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू: विजय कुमार सिंह

लोकशाहीला सशक्त करणारा नेता गेला: स्मृती इराणी

ते माझे रोल मॉडेल होते: शरद यादव

गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी त्यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 10:15 am

Web Title: political leaders pays tribute to former defence minister george fernandes
Next Stories
1 राज्यसभा निवडणुकीत अहमद पटेल यांनी लाच दिली, भाजपा नेत्याचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 गुजरातचे माजी मुख्यमंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश
Just Now!
X