बिहारमधील वैशाली जिल्ह्य़ात गुरुवारी लोकजनशक्ती पक्षाच्या एका नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या हल्ल्यात मृत व्यक्तीचा नातेवाईक व राघोपूर येथील पक्षाचा पदाधिकारी गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. लोकजनशक्ती पक्षाचे नेते बैजनाथ सिंग पाटण्याकडे येत असताना त्यांच्या वाहनावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात सिंग ठार झाले.