News Flash

वाढत्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये ३८ हजार लोकांचा मृत्यू

वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळेच हवेतील नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते.

वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळेच हवेतील नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते.

डिझेलच्या वाढत्या वापरामुळे नायट्रोजन ऑक्साइडच्या प्रमाणात वाढ

डिझेल ट्रक आणि कारच्या वापरामुळे वाढत्या प्रदूषणाचे २०१५ या वर्षांत जगभरात ३८ हजार बळी गेल्याचा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे. मात्र, या बळींच्या मागील प्रदूषणाचे कारण लपविण्याचा कार कंपन्यांनी प्रयत्न केल्याची धक्कादायक माहितीही या संशोधनात मिळाली आहे.

मृतांमधील चारपंचमांश लोक प्रदूषित क्षेत्रातील म्हणजे युरोपियन संघ, चीन आणि भारतातील असल्याचे संशोधकांनी सांगितले. ते नायट्रोजन ऑक्साइड या विषारी वायूच्या संपर्कात आल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. नायट्रोजन ऑक्साइडमुळे आम्लयुक्त पाऊस पडतो. तसेच, त्यात अमोनियाचा समावेश असेल तर फुप्फुसाचे विकार, कर्करोग, श्वसनाचे आजार होऊन त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

सध्याची प्रदूषणाची पातळी विचारात घेता वाहनांचे प्रमाण वाढल्यामुळेच हवेतील नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट होते. २०१५ पासून व्होक्सव्ॉगन आणि इतर वाहन कंपन्यांनी वाहनांमध्ये प्रदूषणाला साहाय्यभूत ठरणारे तंत्रज्ञान वापरल्यामुळे तपासणीत आढळल्यापेक्षा अधिक प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती.

ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, जपान, मेक्सिको, रशिया, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या वाहन निर्मिती करणाऱ्या देशांतील कंपन्यांनी डिझेलच्या वापरामुळे ५० टक्के अधिक नायट्रोजन ऑक्साइड हवेत मिसळत असल्याचा दावा केला आहे. या अतिरिक्त प्रदूषणामुळेच ३८ हजार जणांचा मृत्यू झाला असून भविष्यात हा आकडा वाढण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. नायट्रोजन ऑक्साइडच्या उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढून ओझोनला त्याचा फटका कसा बसतो हा संशोधनाचा विषय होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2017 3:23 am

Web Title: pollution causes 38 thousand people died in 2015
Next Stories
1 केंद्र सरकारविरोधात पुढील दोन वर्षे काँग्रेसची मोहीम
2 सायबर हल्ला उत्तर कोरियातून ? ; गुगलमधील भारतीय तंत्रज्ञाचा दावा
3 ‘मी रशियाला गुप्त माहिती दिली नाही’
Just Now!
X