कर्नाटकमधील प्रमुख विरोधीपक्ष असणाऱ्या काँग्रेसची मोठी नाचक्की झाली. पक्षाचे आमदार प्रकाश राठोड हे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये आपल्या मोबाईलवर अश्लील व्हिडीओ (पॉर्न) पाहातानाची दृृष्य कॅमेरात कैद झाली आहे. सभागृहामधील कॅमेरामनने कामकाजादरम्यान काढलेल्या फोटोंमध्ये राठोड अश्लील व्हिडीओ पाहताना दिसत आहेत. यासंर्भात राठोड यांनी प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरणही दिलं. मी इंटरनेटवर काही बघत नव्हतो. मी माझ्या मोबाईलमधील काही व्हिडीओ डिलीट करत होतो, असं राठोड म्हणाले आहेत.

मी सामान्यपणे सभागृहामध्ये मोबाईल घेऊन जात नाही. मात्र या सत्रामध्ये मला काही प्रश्न विचारायचे होते. याच कारणासाठी मी बाईल घेऊन आलो होते. त्याचसंदर्भात मी मोबाईल चेक करुन लागलो. त्यावेळी माझ्या मोबाईलची मेमरी फूल झाल्याचं दिसलं. त्यानंतर मी मोबाईलमधील व्हिडीओ क्लिप डिलीट करु लगालो, असं राठोड सांगतात.

ubt shiv sena leader jyoti thackeray in yavatmal washim constituency tour
मविआ उमेदवाराच्या कार्यपद्धतीने पक्षांतर्गत नाराजी? -शिवसेना उबाठाच्या उपनेत्या…
Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
sangli
सांगलीच्या निर्णयाने कार्यकर्ते अस्वस्थ; निवडणुकीवर बहिष्कार अथवा बंडखोरीची मागणी
Adam Master, adam master solapur
घरकुलांचे श्रेय घेणाऱ्या भाजपला फटकारत आडम मास्तर प्रणिती शिंदेंच्या पाठीशी, पारंपरिक प्रतिस्पर्धी आले एकत्र

अशा्प्रकारे कर्नाटकच्या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी अश्लील साहित्य सभागृहामध्येच पाहण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. सन २०१२ मध्ये लक्ष्मण सावदी आणि इतर दोन आमदार सभागृहाच्या आतमध्ये सदनाची कारवाई सुरु असताना अश्लील व्हिडीओ पाहताना कॅमेरात कैद झाले होते. त्यावेळी सावदी हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्री होते. हे प्रकरण समोर आलं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला होता. विरोधीपक्ष काँग्रेस आणि जनता दलाने (एस) संबंधिक सदस्यांना सदनामधून निलंबित करण्याची आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती.

राठोड यांच्या फोटोसंदर्भात बोलताना भाजपाच्या प्रवक्त्यांनी राठोड यांच्याविरोधात कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केलीय. हे वरिष्ठ सभागृह आहे. विद्वान लोकं येथे येतात मात्र ते आज चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आहे. मागच्या वेळेस काँग्रेसने मोठा गदारोळ माजवला होता. आज त्यांच्या पक्षाचा सदस्यच असे व्हिडीओ बघतानाचा फोटो समोर आलाय. अपेक्षा आहे की राठोड यांच्याविरोधात डी. के. शिवकुमार कठोर कारवाई करतील आणि त्यांना पक्षातून काढून टाकतील, असं भाजपाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरुन आता कर्नाटकमधील राजकारण तापण्याची चिन्हं दिसत आहेत.