News Flash

‘यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्लाची शक्यता’

यंदा तेथील परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे.

संग्रहित छायाचित्र

यंदाच्या वर्षी अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ल्या शक्यता जास्त असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रमुख के.के. शर्मा यांनी मंगळवारी दिली. यात्रा शांततेत व सुरक्षित होण्यासाठी बीएसएफ आणि इतर सुरक्षा दलांकडून योग्य ती काळजी घेत जात असल्याचेही ते म्हणाले.

बीएसएफच्या एका कार्यक्रमात ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. यंदा तेथील परिस्थिती खूप तणावपूर्ण आहे. मोठे संकट येऊ शकते. आम्ही सुरक्षा दले आणि आमच्या कमांडो्जला तैनातीसंबंधी सर्व काळजी घेण्यास सांगितले आहे. ही यात्रा दरवेळेप्रमाणे यंदाही शांततेत होण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत, असे ते म्हणाले. वार्षिक अमरनाथ यात्रा २९ जूनपासून सुरू होणार आहे. ऑगस्ट अखेरीपर्यंत ही यात्रा चालेल.

यात्रेचे नियोजन करणाऱ्या श्री अमरनाथ जी श्राइन बोर्डने श्रीनगरपासून १४१ किमी अंतरावर व १२७५६ फुट उंचीवर असलेल्या गुहेत चालत येणाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे. बोर्डने १३ वर्षांहून कमी आणि ७५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना तीर्थयात्रेस येण्यास परवानगी दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2017 8:42 pm

Web Title: possibility of terror attack on amarnath yatra says bsf chief
Next Stories
1 आम्ही काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणारच; पाकिस्तानची दर्पोक्ती
2 बलात्काराच्या आरोपाखाली तुरूंगात असलेल्या माजी मंत्र्याची मुलायमसिंहाकडून पाठराखण
3 Panama case: पाक पंतप्रधान नवाज शरीफांची कन्या मरिअम चौकशीच्या जाळ्यात
Just Now!
X