News Flash

करोनावर लागू पडलेल्या रेमडेसिविर औषधाबद्दल चिंता वाढवणारी बातमी

या औषधाला जगभरातून मागणी पण...

जगभरात एकाबाजूला करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढतेय, तर दुसऱ्याबाजूला अजूनही या व्हायरसला रोखणारी लस बाजारात आलेले नाही. या परिस्थितीत निवडक औषधं करोना व्हायरसवर प्रभावी ठरली आहेत. त्यामुळे या औषधांना जगभरातून मोठी मागणी आहे. वेळेवर ही औषध उपलब्ध होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

दरम्यान रेमडेसिवर औषधाबद्दल एक चिंता वाढवणारी बातमी आहे. अमेरिकेने रेमडेसिविर औषधाचा सर्व स्टॉकच विकत घेतला आहे. अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस ही कंपनी रेमडेसिविर हे औषध बनवते. रेमडेसिविरचा सर्व साठाच अमेरिकेने विकत घेतल्यामुळे आता या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिलेय.

रेमडेसिविर करोना व्हायरसवर लागू पडलेल्या प्रभावी औषधांपैकी एक आहे. हा निर्णय म्हणजे अमेरिका फर्स्ट या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेशी सुसंगत आहे. भारतात ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने सिप्ला आणि हिट्रो लॅब या दोन कंपन्यांना रेमडेसिविर औषध उपलब्ध करुन देण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पुढच्या तीन महिन्यांसाठी रेमडेसिविरचं सर्व उत्पादन फक्त अमेरिकन नागरिकांसाठी करण्याचा ट्रम्प प्रशासनाने गिलीयड सायन्सेस बरोबर करार केला आहे. ‘कुठल्याही अमेरिकन नागरिकांना रेमडेसिविर औषधाची गरज असेल तर त्याला ते लगेच मिळालं पाहिजे’ असे अमेरिकेच्या आरोग्य आणि मानवी सेवा विभागाचे सचिव अ‍ॅलेक्स अझर यांनी सांगितले. रेमडेसिविरचा सर्व साठा विकत घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांनी टीका केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 3:00 pm

Web Title: possible coronavirus drug remdesivir goes out of stock dmp 82
Next Stories
1 चिनी लष्करच देशात करणार सत्तापालट?; सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे असंतोष वाढला
2 ठप्प असलेली रेल्वे १०० टक्के वेळापत्रकानुसार; पियूष गोयलांनी थोपटली पाठ
3 हाँगकाँगवरुन चीनला घेरण्याची भारताची व्यूहरचना, UN मध्ये पहिल्यांदाच…
Just Now!
X