News Flash

नोटाबंदीच्या समर्थनार्थ भाजप करणार देशभरात हाय-फाय प्रचार

निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)

नोटाबंदीच्या निर्णयानंतर विरोधी पक्षांच्या खासकरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या निशाण्यावर असलेल्या भाजपने नोटाबंदीच्या समर्थनार्थ देशभरात हाय-फाय प्रचार मोहीम राबवण्याचा निर्धार केला आहे. त्याची तयारीही सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर या प्रचारमोहीमेला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रीय मंत्री किमान १० ठिकाणांचा दौरा करतील. त्यात प्रचार फेरीबरोबरच इतर कार्यक्रमांमध्येही सहभागी होण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्येक केंद्रीय मंत्री ग्रामीण भागाचा दौरा करतील. ज्या राज्यांत निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या समस्य़ा अजून काही दिवस कायम राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर तेथील परिस्थिती आणि अडचणींबाबतची माहिती सर्व मंत्रालयांना पाठवण्यात आली आहे. नोटाबंदीच्या समर्थनार्थ प्रचारासाठी सर्व सामाजिक माध्यमांचा पुरेपूर वापर केला जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयाने सर्व मंत्र्यांना माहिती पाठवण्यात आली आहे. त्यात नोटाबंदीनंतरच्या सर्व बाजू विस्ताराने स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

अर्थ मंत्रालयाने पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाची कारणे, भविष्यातील योजना आणि धोरणांवर होणारे परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर परिस्थिती निवळण्यासाठी देशवासियांकडे ५० दिवसांचा अवधी मागितला होता. नोटाबंदीनंतर सरकार आणि रिझर्व्ह बँकेने अनेक नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे सरकार जनतेच्या निशाण्यावर आले आहे. बँका आणि एटीएमबाहेरील रांगांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळेही नोटाबंदीच्या विरोधात वातावरण निर्माण झाले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 6:37 pm

Web Title: post demonetisation government to roll out massive campaign
Next Stories
1 जुन्या नोटा बाळगल्यास तुरुंगवास नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
2 ‘हे’ कारण देऊन आरबीआयने नोटाबंदीची माहिती देण्यास दिला नकार
3 कलमाडींनंतर चौटालाही भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन अध्यक्षपद सोडण्यास तयार
Just Now!
X