24 September 2020

News Flash

अमरनाथ यात्रा स्थगित करण्याचा रविशंकर यांचा सल्ला, सोशल युजर्स भडकले

रविशंकर यांनी अमरनाथ यात्रा पुढील वर्षीपर्यंत स्थगित केली जावी, असा सल्ला

(फोटो क्रेडिट - एक्सप्रेस फोटो प्रविण खन्ना / यु ट्यूब)

आध्यात्मिक गुरू आणि आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री. श्री. रविशंकर यांनी अमरनाथ यात्रा पुढील वर्षीपर्यंत स्थगित केली जावी, असा सल्ला दिला आहे. यात्रेच्या मार्गातील अडचणी आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रविशंकर यांनी हा सल्ला दिला. पण रविशंकर यांचा हा सल्ला सोशल मीडियाच्या युजर्सना आवडला नाही आणि त्यांनी रविशंकर यांच्या विरोधातच मोर्चा खोलला व त्यांना उलटसुलट उत्तर देण्यास सुरूवात केली.

मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे पवित्र गुफेकडे जाणाऱ्या बालटाल आणि पहलगाम दोन्ही मार्गात मोठ्या प्रमाण अडथळे येऊ शकतात, त्यामुळे भाविकांनी पुढील वर्षीपर्यंत आपली यात्रा स्थगित करावी असा सल्ला त्यांनी दिला. ट्विटरद्वारे त्यांनी ‘श्री अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष, गव्हर्नर श्री एनएन व्होरा आणि सीमा सुरक्षा दलाने खूप प्रयत्न करुनही यात्रेचा मार्ग भविष्यात प्रवासासाठी उपयुक्त असेल याची शक्यता कमीच आहे,’ असं ट्विट केलं.

पण रविशंकर यांनी दिलेला हा सल्ला काही सोशल युजर्सना अजिबात पटला नाही आणि त्यांनी रविशंकर यांनाच धारेवर धरलं. अशीच मानसुकता हिंदूंना नपुंसक बनवते, शत्रूला घाबरुन घरी बसण्याची आमची संस्कृती नाही, आपल्याच देशात महादेवाचं दर्शन करु शकत नाही हा कोणता न्याय आहे? अशा प्रकारचे ट्विट युजर्सकडून केले जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:43 pm

Web Title: postpone amarnath yatra says sri sri ravi shankar
Next Stories
1 #WorldPopulationDay: जागतिक लोकसंख्येबद्दल या १२ गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
2 अमेरिकेचे ऐकाल तर परिणाम भोगावे लागतील, इराणचा भारताला इशारा
3 सुप्रीम कोर्टाच्या सद्सदविवेकबुद्धीवर केंद्राने सोडला समलैंगिकतेचा फैसला
Just Now!
X