केरळमधून बनावट महिला अ‍ॅडव्होकेटची धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळच्या अलाप्पुझामध्ये, सेसी जेवियर नावाच्या महिलेने एलएलबी पदवी मिळवल्याशिवाय आणि राज्य बार कौन्सिलमध्ये प्रवेश घेतल्याशिवाय दोन वर्षांहून अधिक काळ वकीली केली. ही महिला बनावट वकिल असल्याचा कोणालाही संशय आला नाही. बनावट वकील सेसी जेवियर यांच्या विरोधात अलाप्पुझा बार असोसिएशनचे सेक्रेटरी अ‍ॅड. अबिलेश सोमण यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कायद्याची पदवी न घेता जिल्हा कोर्टासह अन्य न्यायालयांच्या कामकाजात सेसी जेवियर यांचा सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नंतर हे प्रकरण असोसिएशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे आरोपी महिला अलाप्पुझा कोर्टातील वरिष्ठ वकील व्ही. शिवदासन यांच्याकडे प्रॅक्टिस करत होती.

महिलेची अ‍ॅडव्होकेट कमिश्नर म्हणूनही नियुक्ती

आरोपी महिलेने मार्च २०१९ मध्ये बार कौन्सिलमध्ये नाव नोंदविल्याचा दावा करत अ‍ॅलेप्पी बार असोसिएशनमध्ये सदस्यत्व मिळावे यासाठी अर्ज केला होता. प्रॅक्टिस दरम्यान, ती अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात हजर होती. काही अहवालानुसार आरोपी महिलेची काही प्रकरणांमध्ये अ‍ॅडव्होकेट कमिश्नर म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर यावर्षी बार असोसिएशनची निवडणूकही ती लढली आणि ग्रंथपाल म्हणूनही निवडली गेली.

हेही वाचा – “अर्थव्यवस्थेसाठी आणखी कठीण काळ,भारताने आपला प्राधान्यक्रम निश्चित करावा”; मनमोहन सिंग यांची सूचना

बार असोसिएशनचे अधिकारी चकीत 

दरम्यान, बार असोसिएशनला एक पत्र १५ जुलै रोजी प्राप्त झाले होते, त्यात असा आरोप केला होता की, सेसी जेवियरकडे एलएलबी पदवी आणि नोंदणी प्रमाणपत्र नाही. याबाबत केरळ बार कौन्सिला प्रश्न विचारल्यावर बार असोसिएशनचे अधिकारी चकीत झाले. सेसी जेवियर दिलेला नावनोंदणी क्रमांक तिरुअनंतपुरममध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या दुसर्‍या वकिलाचा होता.

स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल

सेसी जेवियरकने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर असोसिएशनने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तातडीने कारवाई केली, अशा प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांचेही लक्ष वेधण्यात आले. असोसिएशनने दिलेल्या नोटिशीला त्याच वेळी सेसी जेवियर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

यानंतर असोसिएशनने सेसी जेवियरविरूद्ध स्थानिक पोलिसांत गुन्हा दाखल केला. असोसिएशनने असा आरोप केला आहे की, जेवियरने ग्रंथपाल म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून त्याच्याशी संबंधित काही पुस्तके व कागदपत्रे चोरून नेली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Practice without degree for two year of fake female advocate also won the bar election srk
First published on: 24-07-2021 at 14:40 IST