News Flash

साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना कर्करोग

सन २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या स्फोटातील तसेच सुनील जोशी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना कर्करोग असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले

| January 11, 2013 05:03 am

सन २००८ मध्ये मालेगाव येथे झालेल्या स्फोटातील तसेच सुनील जोशी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना कर्करोग असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले आहे. येथील जवाहरलाल नेहरू कर्करोग रुग्णालयात प्रज्ञासिंग यांना स्तनाचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रज्ञासिंग यांच्या काही वैद्यकीय तपासण्या गेले दोन दिवस सुरू होत्या. या तपासण्यांचे निष्कर्ष नुकतेच हाती आले असल्याचे उपचारकर्त्यां डॉक्टरांनी सांगितले. या आजारावर उपचार करण्यासाठी साध्वींनी रुग्णालयात दाखल व्हावे असा सल्ला डॉक्टरांनी दिला, मात्र काही धार्मिक विधी करून मगच आपण उपचारार्थ रुग्णालयात दाखल होऊ, असे प्रज्ञासिंग यांनी सांगितले.
प्रज्ञासिंग यांच्या सहमतीशिवाय त्यांना रुग्णालयात दाखल करता येणार नाही, असे भोपाळ मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक एम. आर. पटेल यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सुनील जोशी यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून मुंबईतील कारागृहात असलेल्या प्रज्ञासिंग ठाकूर यांना भोपाळ येथे हलविण्यात आले होते. त्याचबरोबर २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव येथे झालेल्या स्फोटामागील सूत्रधार असल्याचा आरोपही महाराष्ट्र पोलिसांनी प्रज्ञासिंग ठाकूरांवर केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 5:03 am

Web Title: pradnyasing is suffering from brest cancer
टॅग : Cancer 2,Malegaon Blast
Next Stories
1 गोव्यातील ४६ वर्षांपूर्वीचा जनमत कौल वादात
2 वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने पावले उचलावीत
3 मेधा पाटकर, सक्सेना यांना न्यायालयाचा तडजोडीचा सल्ला
Just Now!
X