News Flash

कारभार स्वीकारेपर्यंत कामाची कल्पना नव्हती : राष्ट्रपती

राष्ट्रपती भवनात वास्तव्य केले त्याबद्दल मुखर्जी यांनी त्यांचे आभार मानले.

| September 8, 2016 01:47 am

राष्ट्रपतिपदाचा कारभार स्वीकारेपर्यंत राष्ट्रपती भवनाचा कारभार कसा चालतो याची आपल्याला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. कारभार कसा चालतो याची कल्पना यावी यासाठी शपथ घेण्यापूर्वी दोन दिवस अगोदर आपल्या कन्येला तेथे पाठविले होते, असेही मुखर्जी म्हणाले.

राष्ट्रपती भवनातील पुराणवस्तूसंग्रहालय २ ऑक्टोबर रोजी कार्यानिव्त करण्यात येणार असून त्यावेळी ब्रिटिश काळातील बांधकाम समोर येईल. इतकेच नव्हे तर विविध देशांच्या प्रमुखांनी, पंतप्रधानांनी, परराष्ट्र मंत्र्यांनी, संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भेटीच्या वेळी ज्या भेटवस्तू दिल्या त्याही तेथे ठेवण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतींनी पुढाकार घेतलेल्या ‘इन-रेसिडन्स’ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून बंगाली लेखक प्रा. रंजन बॅनर्जी यांनी सात दिवस राष्ट्रपती भवनात वास्तव्य केले त्याबद्दल मुखर्जी यांनी त्यांचे आभार मानले.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आतापर्यंत आयआयटी, एनआयआयटीमधील १४० जणांनी येथे वास्तव्य केले. राष्ट्रपती भवनाच्या ग्रंथालयातील पुस्तकांचा आस्वाद घेण्यासाठी  केवळ पाचच नव्हे तर १५ वर्षेही पुरेशी नाहीत, असेही मुखर्जी म्हणाले. ब्रिटिशांच्या काळात तत्कालीन व्हाइसरॉय इतक्या प्रशस्त आहेत की एखाद्याला तेथे शांत झोपही लागणार नाही, अनेकदा आपण राष्ट्रपती भवनात गेलो होतो, मात्र राष्ट्रपती भवनाच्या कारभाराची आणि आतमध्ये नक्की काय आहे त्याची आपल्याला कल्पना नव्हती, असे ते म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 1:47 am

Web Title: pranab mukherjee president of india
Next Stories
1 नासा लघुग्रहाचा पाठलाग करण्यासाठी यान पाठवणार
2 अमेरिका भारताला २२ ड्रोन विमाने देणार
3 गडकरींकडून बैठकांचा धडाका
Just Now!
X