30 November 2020

News Flash

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अनंतात विलीन; साश्रुनयनांनी दिला अखेरचा निरोप

देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले, ते ८४ वर्षांचे होते. सोमवारी लष्कराच्या रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. दरम्यान त्यांना करोनाची लागणही झाली होती. मुखर्जी यांच्या निधनामुळं केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतील १० राजाजी मार्ग येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी घरी जाऊन मुखर्जी यांना अभिवादन केले. तसेच उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांनी प्रणव मुखर्जी यांचे अंत्यदर्शन घेतले.

कोविड-१९ च्या प्रोटोकॉलनुसार, माजी राष्ट्रपतींचे पार्थिव अंत्यसंस्कारांसाठी गन कॅरेजऐवजी शववाहिकेतून लोधी रोड येथील स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने सर्व सार्वजनिक इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 3:18 pm

Web Title: pranab mukherjees funeral took place today with full military honours aau 85
Next Stories
1 “आम्ही करुन दाखवलं”, करोना लसीसंबंधी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
2 “देशावासीयांनी उभ्या केलेल्या अर्थव्यवस्थेचा भाजपानं अनर्थ करून टाकला”
3 खोकला सोडा, करोनावर जोक करणंही विद्यार्थ्यांना पडणार महागात; ब्रिटनमधील शाळांचं कडक धोरण
Just Now!
X