News Flash

प्रशांत भूषण यांची सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात तक्रार

न्या. मिश्रांविरोधात मेडिकल कॉलेज घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल

सरन्यायाधीशांविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात मेडिकल कॉलेज घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

सरन्यायाधीशांविरोधात आवाज उठवणाऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनी आता सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात मेडिकल कॉलेज घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सरन्यायाधीशांविरोधात पत्रकार परिषद करणाऱ्या चारही न्यायाधीशांना भूषण तक्रारीची प्रत पाठवली आहे. सीबीआयच्या एफआयआरनुसार, प्रसाद एज्युकेशन ट्रस्ट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना लाच देण्याची योजना होती. या प्रकरााची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचे नेतृत्व दीपक मिश्रा करत होते.

न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर यांनी या कथित घोटाळ्याची सुनावणी करण्यासाठी एक संवैधानिक खंडपीठ स्थापन करण्याचा आदेश दिला होता. पण नोव्हेंबरमध्ये सरन्यायाधीश मिश्रा यांनी हा आदेश बदलला होता. हाच मुद्दा पुढे करत भूषण आणि बेजबाबदारपणा आणि अनियमिततेचे आरोप करत न्या. मिश्रा यांच्या चौकशीची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण..
प्रसाद एज्युकेशन ट्रस्टला मेडिकल कॉलेजसाठी मान्यता हवी होती. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता नाकारली होती. त्यानंतर एका मध्यस्थाने मान्यता देण्याचा विश्वास दिला. ट्रस्टकडून यासाठी त्याला पैसे देण्यात आले, असा आरोप आहे. सीबीआयने याप्रकरणी तपास केला आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कुद्दूसी आणि इतर काही लोकांना अटक करण्यता आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 6:21 pm

Web Title: prashant bhushan complaint against chief justice of india deepak mishra
Next Stories
1 अमेठीत काँग्रेस-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
2 एकाच स्कुटरवरुन फिरणाऱ्या मोदी-तोगडियांमध्ये का आले वितुष्ट?
3 हज यात्रेवरील अनुदान बंद; मोदी सरकारचा निर्णय
Just Now!
X