News Flash

प्रशांत किशोर यांचं पंजाबमधलं भवितव्य अधांतरी; सल्लागार पदालाही रामराम ठोकण्याची चिन्हं

त्यांच्या उदासिन भूमिकेमुळे पंजाब सरकार काळजीत पडलं आहे.

पंजाबमधल्या गोळीबार प्रकरणाच्या चौकशीबाबत पंजाब काँग्रेसमधल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांचे मुख्य सल्लागार असलेले राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची भूमिका अनिश्चिततेची आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर किशोर यांनी स्पष्ट केलं होतं की, ते आता यापुढे राजकीय रणनीतिकार म्हणून काम करणार नाहीत. पण आता त्यांनी राजकीय सल्लागार या भूमिकेतूनही संन्यास घेणार असल्याचं समोर येत आहे. पंजाब सरकारच्या सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे.

या सरकारच्या सूत्रांनी सांगितलं की प्रशांत किशोर यांची सल्लागारपदी केलेल्या नेमणुकीच्या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने सरकारला नोटिस बजावली. मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सूत्रांकडून असं कळत आहे की, किशोर हे काही नेत्यांना सांगत होते की ते कोणत्याही प्रकरणावर भाष्य करण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही.

हेही वाचा- निवडणूक व्यवस्थापनातून प्रशांत किशोर यांचा संन्यास!

मुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार यांच्या सुसूत्रता नाही, खटके उडू लागले आहेत. परिस्थिती योग्य नाही. किशोर अशा परिस्थितीत कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत. किशोर जर यावेळी बाजूला झाले तर पंजाबच्या सरकारवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो असं मतही एका नेत्याने व्यक्त केलं आहे.

पुढे ते असंही म्हणाले की जेव्हा एखाद्या पक्षासोबत प्रशांत किशोर असतात, त्यावेळी त्यांची स्थिती चांगली आहे, राजकारणातली पकड चांगली आहे असं समजलं जातं. मात्र, जेव्हा ते पक्षातून बाहेर पडतात तेव्हा ही स्थिती बिकट होत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 3:14 pm

Web Title: prashant kishors future in punjab uncertain said government sources vsk 98
Next Stories
1 धक्कादायक! तरुणीला एकाच वेळी देण्यात आले लसीचे सहा डोस; डॉक्टरांची धावपळ
2 धक्कादायक! लग्नानंतर अवघ्या पाच तासांमध्ये नवविवाहितेचा मृत्यू
3 युद्धपातळीवर लस तयार करण्याची गरज, अधिक कंपन्यांना सक्षम करा- केजरीवाल
Just Now!
X