ओमानमध्ये भारतीय परिचारिकेची (नर्स) चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गुरुवारी तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आला. चिकू रॉबर्ट नावाची ही महिला मूळची केरळची रहिवासी होती. ओमानमधील सलाह शहरातील बद्र अल समा रुग्णालयात ती काम करत होती. 'टाइम्स ऑफ ओमान'मधील वृत्तानुसार, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेली चिकू गर्भवती होती. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी चिकूच्या हत्येची कठोर शब्दांत निंदा केली असून, या सर्व प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. दरम्यान, बद्र अल समा रुग्णालयाने तिच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. चिकूची हत्या ही चोरीच्या कारणामुळे झाल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. I am sorry to know about the murder of Ms.Chikku Robert - an Indian national from Kerala working as a nurse in Oman. /1— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2016 I have asked Indian Ambassador to ascertain all the facts and report. My heartfelt condolences to the bereaved family. /2— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) April 21, 2016