News Flash

मातृत्वाला सलाम! रस्त्यात बाळाला जन्म दिला, त्यानंतर पायी केला १५० किलोमीटरचा प्रवास

महिलेने आणि तिच्या नवऱ्याने महाराष्ट्रात नाशिकमधून पायी चालायला सुरुवात केली होती.

महाराष्ट्रातून पायी चालत आपल्या गावी निघालेल्या एका गर्भवती मजूर महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. मध्य प्रदेशात या महिलेचे गाव आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर या महिलेने दोन तास रस्त्यावरच विश्रांती घेतली. त्यानंतर उर्वरित १५० किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी पायची प्रवास सुरु केला. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेने आणि तिच्या नवऱ्याने महाराष्ट्रात नाशिकमधून पायी चालायला सुरुवात केली होती. मध्य प्रदेशात सतनामध्ये त्यांचे गाव आहे. मंगळवारी वाटेतच या महिलेला प्रसुतीवेदना सुरु झाल्या. “बाळाला जन्म दिल्यानंतर तिने दोन तास तिथे विश्रांती घेतली व नंतर पुन्हा उर्वरित १५० किलोमीटरचा प्रवास सुरु केला” असे महिलेच्या नवऱ्याने सांगितले.

“महिलेची वाटेत प्रसुती झाल्याचे समजल्यानंतर सीमेवरील प्रशासनाने त्यांच्यासाठी बसची व्यवस्था केली. ऊंचीहारा येथे पोहोचल्यानंतर आम्ही त्यांना इथे घेऊन आलो. आईची आणि बाळाची तपासणी झाली असून दोघे सुखरुप आहेत” असे सतनाचे ब्लॉक मेडिकल अधिकारी ए.के.रे यांनी सांगितले. अशाच दुसऱ्या एका घटनेत तेलंगणहून छत्तीसगडला निघालेल्या एका मजूर महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली.

लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे मोठया प्रमाणावर हाल होत आहेत. त्यांचा रोजगार बंद झाला आहे. अन्नाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ते गावी निघाले आहेत. सरकारने अशा मजुरांसाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केल्या असल्या तरी ती संख्या पुरेशी नाही. देशाच्या वेगवेगळया भागातून मजूर अजूनही पायीच चालत आपल्या गावी जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:07 pm

Web Title: pregnant migrant labourer delivers baby on road then another 150 km after delivery dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मोदींच्या भाषणावर शोभा डे म्हणतात, “पॅकेजबद्दलच बोलायचं होतं तर…”
2 चूक लक्षात येताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, सॉरी
3 … तर मोदी लाईव्ह भाषण करतातच कशाला?; प्रकाश आंबेडकर यांची टीका
Just Now!
X