19 September 2020

News Flash

प्रीती झिंटाच्या सेक्रेटरीचे निधन

प्रीतीने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाचे सेक्रेटरी प्रसाद राव यांचे निधन झाले आहे. प्रीतीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती देत प्रसाद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच प्रीतीने पोस्टमध्ये २०२० हे वर्ष क्रूर असल्याचे देखील म्हटले आहे.

प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रसाद राव यांच्या सोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, ‘हे वर्ष क्रूर ठरले आहे. मला कधी वाटले नव्हते की या वर्षात असं काही घडेल. प्रसाद तुझ्यावर माझे प्रचंड प्रेम आहे’ असे म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे.

प्रीतीच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. दीया मिर्झाने ‘माझा यावर विश्वासच बसत नाही’ असे म्हटले आहे. तर बॉलिवूड फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने ‘मला ऐकून दु:ख झाले. मला आजही आठवते ते चित्रपटाच्या सेटवर आल्यावर सतत हसत असायचे. तसेच त्यांचे कामही चांगले होते’ असे म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 11:50 am

Web Title: preity zinta condoles death of secretary prasad rao avb 95
Next Stories
1 प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल, जाहीर केली नवी करप्रणाली
2 चीन : चिकन विंगमध्ये आढळला करोना विषाणू ; फ्रोझन फूड घेताना काळजी घेण्याचं आवाहन
3 २४ तासांत आढळले ६६,९९९ रुग्ण; ९४२ जणांचा मृत्यू
Just Now!
X