News Flash

संस्थापकाच्या सोडचिठ्ठीनंतरही वत्स यांचे ‘ब्लॅकबेरी’ प्रेम कायम!

ब्लॅकबेरी हॅण्डसेटच्या 'रिसर्च इन मोशन' कंपनीमधील आपली गुंतवणूक काढणार नसल्याचे कंपनीचे सर्वांत मोठे गुंतवणूकदार प्रेम वत्स यांनी स्पष्ट केलंय.

| April 12, 2013 01:26 am

ब्लॅकबेरी हॅण्डसेटच्या ‘रिसर्च इन मोशन’ (रिम) कंपनीमधील आपली गुंतवणूक काढणार नसल्याचे कंपनीचे सर्वांत मोठे गुंतवणूकदार प्रेम वत्स यांनी स्पष्ट केलंय. ‘रिसर्च इन मोशन’ची स्थापना करणाऱया माईक लॅझारडिस यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचेच मित्र असलेले वत्स काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. 
‘रिम’च्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य असलेल्या वत्स यांच्याकडे कंपनीचे १० टक्के शेअर आहेत. लॅझारडिस यांच्यासोबतच्या मैत्रीमुळेच वत्स यांनी ‘रिम’मध्ये पैसे गुंतविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, गेल्या महिन्यात ५२ वर्षांच्या लॅझारडिस यांनी ‘रिम’मधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या एक मे रोजी ते कंपनीतून औपचारिकपणे बाहेर पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वत्सदेखील ‘रिम’ला सोडचिठ्ठी देणार का, याबद्दल मोबाईल तंत्रज्ञान विश्वात उत्सुकता होती.
ब्लॅकबेरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यापासून थॉर्टन हेन्स उत्कृष्ट काम करताहेत. त्याचबरोबर कंपनीचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे त्यांना सोबत करण्याचा निर्णय घेत असल्याचे वत्स यांनी स्पष्ट केले. लॅझारडिस यांच्या तांत्रिक ज्ञानाचे वत्स यांनी तोंडभरून कौतुकही केली. लॅझारडिस यांची आम्हाला कायमच आठवण येईल, असे त्यांनी सांगितले.
‘रिम’मधून बाहेर पडणाऱया लॅझारडिस यांनी भांडवली गुंतवणूक क्षेत्रात स्वतःची नवी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 1:26 am

Web Title: prem watsa blackberrys largest investor says stands by company
Next Stories
1 चीनमध्ये माध्यम प्रशिक्षण केंद्राची स्थापना
2 मुशर्रफ याचक बनले!
3 ‘भाजपने सिद्धूकडे दुर्लक्ष केले’
Just Now!
X