28 October 2020

News Flash

वाहनांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांसाठी प्रीमियम दुप्पट

कार घेणाऱ्यांना जास्तीच्या इन्शुरन्सचा भुर्दंड, टू व्हिलरसाठीचाही इन्शुरन्स महागला

दुचाकी खरेदी करणाऱ्यांना आता त्यांच्या वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स द्यावा लागणार आहे. तर कार खरेदी करणाऱ्यांसाठी इन्शुरन्सचा प्रीमियम दुप्पट झाला आहे. सप्टेंबर महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. कोर्टाने दिलेल्या दोन निर्णयांमुळे दर इतके वाढल्याचे बघायला मिळते आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स कव्हर अनिवार्य असणार आहे. तसेच कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कार मालकांसाठी १५ लाखांचा पर्सनल अॅक्सिडंट कव्हर घेणेही अनिवार्य असणार आहे. लॉंग टर्म प्रीमियम पेमेंट्समुळे नव्या वाहनांची किंमत वाढली आहे.

जर तुम्हाला नवीन बाईक घ्यायची असेल तर तुम्हाला किंमतीच्या दहा टक्के रक्कम इन्शुरन्स म्हणून भरावी लागणार आहे. उदाहरणार्थ तुम्ही १५० सीसीची गाडी घेतलीत आणि तिची किंमत ७५ हजार असेल तर तुम्हाला साडेसात हजार रुपये इन्शुरन्स भरावा लागणार आहे. कार खरेदी करणाऱ्या तीन वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणेही अनिवार्य आहे. पर्सनल अॅक्सिडंट कव्हरसाठी ७५० रुपये जास्त खर्च करावे लागणार आहेत. १००० सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी इन्शुरन्स २० हजारापर्यंत पोहचला आहे. सप्टेंबर महिन्याआधी यासाठी १० हजार रुपये मोजावे लागत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 3:33 pm

Web Title: premium up upfront cost of car cover has doubled from september
Next Stories
1 Sabarimala Protest : केरळच्या मुख्यमंत्र्यांवर जातीय टिपण्णी करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
2 …मग नद्याही म्हणतील ‘मी टू’ : उमा भारती
3 पीएचडी सोडून ‘हिज्बुल’मध्ये भरती झालेल्या मन्नान वानीचा चकमकीत खात्मा
Just Now!
X