News Flash

केंद्र सरकारपुढे राष्ट्रपतींची माघार

कुलगुरूपदी केलेली स्वपन कुमार दत्ता यांची नियुक्ती ‘सरकारच्या सल्ल्यानंतर’ राष्ट्रपतींनी रद्द केली.

संग्रहित छायाचित्र

स्वतच केलेली कुलगुरूंची नियुक्ती रद्द

केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या ‘विनंती’मुळे खुद्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वतचाच निर्णय मागे घ्यावा लागला आहे. शांतीनिकेतनमधील विश्व भारती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी केलेली स्वपन कुमार दत्ता यांची नियुक्ती ‘सरकारच्या सल्ल्यानंतर’ राष्ट्रपतींनी रद्द केली. आता केंद्र सरकार नव्या कुलगुरूंच्या शोधात आहे. त्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यापीठाच्या कार्यकारी समितीची (कर्मसमिती) बैठक बोलावली असून यात नवी कुलगुरू शोधसमिती निवडली जाणार आहे. ही समिती नव्या कुलगुरूची शिफारस करेल.

यापूर्वीच्या शोध समितीचे प्रमुख ‘नॉर्थ ईस्ट हिल’ विद्यापीठाचे कुलगुरू एस. के. श्रीवास्तव होते. त्यांनीच दत्ता यांच्यासह अन्य दोघांची नावे विश्व भारतीच्या कुलगुरूपदासाठी सुचवली होती. गेले दोन वर्षे हे विद्यापीठ कुलगुरूंविनाच कार्यरत होते. विद्यापीठ प्रशासनाने सातत्याने कुलगुरू नियुक्तीचा पाठपुरावा केल्यानंतर केंद्र सरकारकडून नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या. राष्ट्रपती कोविंद यांनी जानेवारीमध्ये शोधसमितीच्या शिफारशींच्या आधारे दत्ता यांच्या नियुक्तीला संमती दिली होती. मात्र, अधिकृत आदेशपत्र काढण्यात आले नाही. उलट, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रपतींना त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची आणि नवी शोधसमिती नेमण्याची विनंती केली. केंद्र सरकारकडूनच ही ‘विनंती’ झाल्यामुळे राष्ट्रपतींनी स्वतच केलेली कुलगुरूंची नियुक्ती मागे घ्यावी लागली.

कुलगुरूपदाच्या संभाव्य यादीतील व्यक्तींकडे नेतृत्व क्षमता नसल्याने त्यांच्या नियुक्तीचा फेरविचार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आले आहे. मात्र, अंतिम यादी राष्ट्रपतींकडे का पाठवली गेली हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:32 am

Web Title: president canceled vice chancellor swapan kumar dutta appointment
Next Stories
1 राजकीय क्षेत्रातून आजन्म हद्दपार करण्याचे प्रयत्न – नवाझ शरीफ
2 ऑस्ट्रेलियाचे विमान पाडण्याचा आयसिसचा डाव उधळला
3 खलिस्तानी दहशतवाद्याला दिलेले निमंत्रण रद्द
Just Now!
X