News Flash

राष्ट्रपती कोविंद ही दलित त्यांनी हाथरस प्रकरणी हस्तक्षेप करायलाच हवा : मायावती

हाथरस प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणांनतर देशात राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. देशभरात विविध ठिकाणी निदर्शनं होतं आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी योगी सरकारला धारेवर धरलं आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनीही योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मायावतींनी ट्विट करत या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावर संपूर्ण देशात आक्रोश आहे. सुरूवातीच्या तपासातून समोर आलेल्या माहितीतून लोकं समाधानी नाहीत. त्यामुळे या घटनेची सीबीआयतर्फे किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी बसपाची मागणी आहे”.

आणखी वाचा- हाथरस पीडितेच्या गावात ३०० पोलिसांची फौज, दोन दिवस कुटुंबाला केलं ‘कैद’; फोन टॅपिंगचा संशय

आणखी वाचा- “मला कोणीच अडवू शकत नाही”, राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार

मायावतींनी आणखी एक ट्विट करत राष्ट्रपतींनी ही या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. “देशाचे माननीय राष्ट्रपतीही उत्तर प्रदेशचे आहेत. ते ही दलित आहेत त्यामुळे त्यांनी सरकारने पीडित कुटुंबासोबत केलेल्या अमानवीय वर्तन लक्ष घेवून या प्रकरणात त्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करत आहे” असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा- हाथरस प्रकरणावरून मायावती राजकारण करत आहेत – रामदास आठवले

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील गावात एका दलित महिलेवर १४ सप्टेंबर रोजी चार जणांनी बलात्कार केला होता. त्यानंतर प्रकृती बिघडल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर मंगळवारी तिचा मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 2:47 pm

Web Title: president kovind is a dalit he must intervene in the hathras case mayawati abn 97
Next Stories
1 हाथरस प्रकरणावरून मायावती राजकारण करत आहेत – रामदास आठवले
2 न्यायासाठी नाही तर राजकारणासाठी राहुल गांधींचा हाथरसमध्ये जाण्याचा प्रयत्न; स्मृती ईराणींची टीका
3 हाथरस : पीडितेची आई म्हणाली,”अधिकारी म्हणत होते खात्यात किती पैसे आले माहित आहे का?”
Just Now!
X