भारत देश उद्या (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. करोना संकटाच्या स्थितीत आणि चीन, पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाला संबोधित केले. राष्ट्रपतींनी आपल्या संबोधनात विविध मुद्द्यांना स्पर्श केला. देशाचे भूदल, वायुदल आणि नौदल देशाची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत असं सांगत त्यांनी चीनला इशारा दिला. तसेच देशाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरही आपलं महत्त्वपूर्ण मत व्यक्त केलं.

नेताजींच्या फोटोवरुन वाद : राष्ट्रपती भवनातील फोटोमधील ‘ती’ व्यक्ती कोण?; केंद्राने दिलं स्पष्टीकरण

“प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती, नवनवी आव्हाने आणि कोविडची आपत्ती असूनही आपल्या शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात शेती उत्पन्न घेतले आहे. भारत देश नेहमीच आपल्या शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असेल. शेतकऱ्यांप्रमाणे आपल्या जवानांचे शौर्य, देशभक्ती व त्याग याचाही आपल्याला अभिमान आहे. सियाचीन आणि गलवान खोऱ्यात -५० ते -६० अंश सेल्सिअस तापमान असतं. जैसलमेरमध्ये ५० अंशांपेक्षा अधिक उन्हात जवान उभे असतात. पण तरीही जवान भारताच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी पार पाडतात. भारताने आपल्या सीमेवर काही देशाबाहेरील हालचालींचा सामना केला आहे. पण आपल्या शूर जवानांनी शेजारील देशांचे ते प्रयत्न हाणून पाडले. यावरून पुन्हा सांगू इच्छितो की लष्कर, हवाई दल आणि नौदल देशाची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत”, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रपतींनी चीनला इशारा दिला.

पंतप्रधान मोदी, दाढी अन् ‘सामना’… भाजपा नेत्याने दिलं उत्तर

“आपले राष्ट्रीय सण सर्व देशवासी राष्ट्रप्रेमाच्या भावनेने साजरे करतात. आपण प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय उत्सव देखील संपूर्ण उत्साहाने साजरा करतो. आपला राष्ट्रध्वज आणि संविधानाबद्दल सर्वजण आदर व्यक्त करतात. माझीदेखील तीच भावना आहे. आपल्या सशस्त्र सेना, निमलष्करी दल आणि पोलिस कर्मचारी हा सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून बरेचदा दूर राहतात. मी त्या सर्व जवानांचे व इतर सेवेतील अधिकारी-कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन करतो”, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

TRP Scam : अर्णब गोस्वामीने मला १२ हजार डॉलर्स आणि ४० लाख रुपये दिले – पार्थो दासगुप्ता

“घटनेच्या प्रस्तावनेत अधोरेखित केलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची मूल्ये आपल्या सर्वांसाठी पवित्र आदर्श आहेत. केवळ प्रशासनातील जबाबदार असणारे नागरिकच नाही तर सामान्य नागरिकांनी या आदर्शांचे दृढ आणि प्रामाणिकपणे पालन केले पाहिजे. कोविडबद्दलही आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली जायला हवी. देशवासियांनी सर्व मार्गदर्शक सूचनांनुसार तुमच्या आरोग्याच्या हितासाठी करोनावरील लसीकरणाचा लाभ घेतला पाहिजे आणि ती लस घ्यायला हवी”, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.