शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येवर दिल्लीच्या एका शाळेतील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संयुक्तपणे एका विशेष वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी शिकविणार आहेत.
डॉ. राजेंद्रप्रसाद सवरेदय विद्यालयातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविल्यानंतर प्रणब मुखर्जी जवळपास १०० शिक्षकांनाही धडे देणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मुखर्जी यांच्यासमोर ही कल्पना मांडली आणि राष्ट्रपतींनाही ती आवडली आणि त्यांनी होकार दिला.दर्जेदार शिक्षण देण्यावर मुखर्जी यांचा भर असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या भाषणांतही त्यांनी गुरू-शिष्य परंपरेवर भर दिला होता. दिल्ली सरकारने ‘बी अ टीचर’ हा अत्यंत प्रतिष्ठेचा कार्यक्रम आखला असून त्याद्वारे कला, संस्कृती, क्रीडा, व्यापार,
राजकारण आणि नागरी सेवा आदी क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना धडे देण्याचे ठरविण्यात आले आहे.